Kartik Aaryan |Lalbaugcha Raja |Ganesh Festival Instagram
मनोरंजन

Kartik Aaryan: गणेश चतुर्थीला 'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी पोहोचला कार्तिक आर्यन

Kartik Aaryan Visits Lalbaugcha Raja:कार्तिक आर्यन पारंपरिक लूकमध्ये दिसला.

दैनिक गोमन्तक

देशभरात 2 वर्षानंतर गणपती उत्सव जल्लोत साजरा होत आहे. आजपासून पुढील 10 दिवस घरोघरी गणेशाची पूजा केली जाणार आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलेब्सही या रंगात रंगले आहेत. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन गणेश चतुर्थीच्या दिवशी पहाटे मुंबईतील सर्वात मोठ्या गणपती बाप्पाच्या म्हणजेच लालबागच्या दरबारात पोहोचला होता. कार्तिकने बाप्पाचे दर्शन घेतले. त्याने लालबागच्या राजाचे दर्शन घेतानाचे काही फोटो चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले आहे. यावेळी कार्तिक आर्यन (Karthik Aryan) पारंपरिक लूकमध्ये दिसला. यावेळी अभिनेत्याने फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

कार्तिकने बाप्पांच्या मूर्तीसमोर चाहत्यांसाठी पोजही दिली आहे.हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहे. कार्तिक आपल्या आई-बाबासह बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला होता. लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर कार्तिकने लहान मुलांसह चाहत्यांसोबत पोज दिली. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

कार्तिक आर्यनने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपले दर्शनाचे फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, अनीस बज्मीच्या 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) मध्ये कार्तिकने कियारा अडवाणी आणि तब्बूसोबत दिसला होता.

या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर 200 कोटींहून अधिक कमाई केली. आता कार्तिक आर्यंन क्रिती सेननसोबत 'शेहजादा' चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 10 फेब्रुवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे. रोहित धवन दिग्दर्शित हा चित्रपट अला वैकुंठापुरमुलू या तेलगू चित्रपटाचा अधिकृत हिंदी रिमेक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pernem: शेतकऱ्यांसाठी घातक असलेला कायदा बदला, कुळ मुंडकार संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Mhaje Ghar: 'माझे घर'चे अर्ज सोमवारपासून उपलब्ध; योजना सामान्यांपर्यंत पोहोचवा, CM प्रमोद सावंतांच्या अधिकाऱ्यांना सूचना

Goa Teacher Recruitment: 'टीईटी'अभावी शिक्षक उमेदवारांची जाणार संधी, परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे 'प्रमाणपत्र' सादर करणे अनिवार्य

Illegal Spa Goa: मसाज पार्लरच्‍या नावाखाली कोलव्यात वेश्‍‍याव्‍यवसाय, दोन पार्लरवर छापे; 9 युवतींची सुटका

Mapusa Theft: म्हापशातील सशस्त्र दरोडा; दोन दिवस उलटले, अद्याप धागेदोरे नाहीत; पोलिसांची आठ पथके मागावर

SCROLL FOR NEXT