Throwback Photo|Old Photo Dainik Gomantak
मनोरंजन

Throwback Photo: फोटोत दिसणाऱ्या या क्युट मुलीने गोविंदा अन् सलमानसोबत दिलेत हिट चित्रपट, ओळखलंत का?

एका बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्रीने बालपणीचा फोटो शेअर केला असून तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

Throwback Photo of Karishma Kapoor: बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्या लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. 'आपले आवडते कलाकार त्यांच्या बालपणी कसे दिसत असतील?', असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडत असतो.

अलिकडेच बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बालपणीचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. या अभिनेत्रीने गोविंदा आणि सलमान खान यांच्यासह अनेक हिट चित्रपट दिले आहे.

करिश्मा कपूरचा हा बालपणीचा फोटो आहे. करिश्माने तिचा हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोला कॅप्शनमध्ये लिहिले, 'अॅन अॅप्पल अ डे किप डॉक्टर्स अवे' करिश्माचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हिट चित्रपटांमध्ये केले काम
'राजा बाबू', 'कुली नंबर 1', 'हिरो नंबर 1' या हिट चित्रपटांमध्ये करिश्माने गोविंदासोबत काम केले आहे. सलमान खानसोबत करिश्माने 'बीवी नंबर वन', 'जुडवा', 'अंदाज अपना अपना', 'हम साथ साथ है' आणि 'दुल्हम हम ले जायेंगे' या चित्रपटांमध्ये (Movie) काम केले आहे.  'दिल तो पागल है', 'रिश्ते' या करिश्माच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.  

करिश्मा कपूरने 2003 मध्ये संजय कपूर या बिझनेसमॅनसोबत लग्नगाठ बांधली. लग्नानंतर संजय आणि करिश्मा यांच्यामध्ये मतभेद झाले. करिश्मा कपूरने संजयच्या कुटुंबावर काही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर 2016 मध्ये संजय आणि करिश्माचा घटस्फोट झाला.

  • करिश्माचे आगामी प्रोजेक्ट

करिश्मा पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर येणार आहे. 'ब्राउन' हा चित्रपट आहे की वेब सीरिज याबाबत करिश्मानं कोणतीही माहिती चाहत्यांना दिली नाही. अभय देव हा ब्राउन नावाच्या या नव्या प्रोजेक्टचं दिग्दर्शन करणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: आधी कौतुकाची थाप, मग दिला धक्का! डॅरिल मिचेलच्या शतकानंतर कोहलीने नेमकं काय केलं? पाहा व्हायरल व्हिडिओ

छ. संभाजी महाराजांनी सांत इस्तेव्हांव किल्ल्यावर हल्ला केला, पोर्तुगिजांना समजायच्या आत जुवे किल्ला घेतला; गोव्यावर औरंगजेबाची वक्रदृष्टी

Russian Tourist Murder: 'त्या' रशियन महिलांचा खून पैशासाठीच, राग आल्यावर 'आलेक्सेई' महिलांना टार्गेट करायचा; तपासात धक्कादायक माहिती समोर

Robbery Attempt: होंडा येथील नवनाथ मंदिरातील दानपेटी फोडण्याचा प्रयत्न

Yashasvi Jaiswal: यशस्वी जयस्वालचा पारा चढला? ध्रुव जुरेलच्या कानाखाली मारायला गेला, नक्की काय घडलं? Watch Video

SCROLL FOR NEXT