Kareena Kapoor Khan Dainik Gomantak
मनोरंजन

पतौडी घराण्याचा ब्लॅक स्टाईलीश लुक होतोय व्हायरल

करीना कपूर खानने तिच्या घरी तिच्या BFF अमृता अरोराच्या वाढदिवसाची पार्टी अरेंज केली होती. तिने तिच्या कुटुंबासोबत आणखी एक फोटो शेअर केला आहे ज्याला चाहत्यांकडून प्रेम मिळाले आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री करीना कपूर तिच्या ग्लॅमरस लूक सतत चर्चेत असते. याच पाश्वभूमीवर करीना कपूर खानने तिच्या घरी BFF अमृता अरोराच्या वाढदिवसाची पार्टी अरेंज केली होती. यावेळी तिने सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवरुन पार्टीचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोवर बेबोच्या चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया आल्या आहेत.

दरम्यान, इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) बरोबर पती सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि मोठा मुलगा तैमूर अनोखी आणि हटके पोज देताना दिसत आहेत. यावेळी तिघांनाही ब्लॅक ड्रेस परिधान केला होता. सैफ अली खान काळ्या रंगाचा कुर्ता आणि पायजामामध्ये दिसत आहे तर दुसरीकडे, करीनाने काळ्या रंगाचा वन पीस घातला आणि निळ्या रंगाच्या स्टिलेटोससह पेअर केला आहे. या दरम्यान, तैमूरने (Timur) काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला होता.

तसेच, अमृताच्या वाढदिवसाच्या पार्टीतील फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करताना, करिनाने “माय बॉईज” असे कॅप्शन दिले आहे. करीना, करिश्मा आणि मलायका सोमवारी आपल्या मैत्रीणीच्या वाढदिवसानिमित्त एकत्र जमल्या होत्या. करिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर अमृताचा एक फोटो शेअर केला असून गोंडस कॅप्शनसह शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवाय, करीना लाल सिंग चड्ढा या चित्रपटाच्या रिलीजसाठी तयारी करत आहे. ज्यामध्ये ती आमिर खान सोबत दिसणार आहे. तिचा पती सैफ अली खान, 'विक्रम वेधा' च्या हिंदी रिमेकसाठी तयारी करत असून, त्यात हृतिक रोशनबरोबर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

फोटोला द्या 80s चा Retro Look! ChatGPT चे हे भन्नाट Prompts वापरा, काही सेकंदांत बदलेल संपूर्ण लूक

Nepal Flood: पीडितांचे हात सरसावले पूरग्रस्तांच्या मदतीला; आसाम, नेपाळसाठी 3 टन मदतसामग्री गोव्‍यातून रवाना

IND vs PAK: रविवारी ठरणार सुपर संडे! आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान भिडणार? चाहत्यांसाठी पर्वणी

Bicholim Traffic Restrictions: डिचोलीत चतुर्थी बाजाराची लगबग; शनिवारपासून वाहनांना 'नो एंट्री'! सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत वाहतुकीवर निर्बंध

Sadetod Nayak: काँग्रेस युतीसाठी प्रयत्नशील, आता गोवा फॉरवर्डनेही स्पष्ट भूमिका घेण्याची गरज

SCROLL FOR NEXT