Kareena Kapoor Dainik Gomantak
मनोरंजन

Kareena Kapoor: 'या' साऊथ सुपरस्टार बरोबर काम करण्याची बेबोची इच्छा

Kareena Kapoor: करीना यावर्षी 'द बकिंगहॅम मर्डर्स' आणि 'जाने जान'मध्ये दिसली होती. लवकरच ती 'द क्रू' आणि 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे.

दैनिक गोमन्तक

Kareena Kapoor: करण जौहरचा टॉक शो कॉफी विथ करण च्या निमित्ताने अनेक कलाकार नेहमीच चर्चेत असतात. आता कॉफी विथ करणच्या आठव्या सीझनमध्ये अनेक कलाकर उपस्थिती लावली आहे.

काही दिवसांपूर्वी आलिया भट्ट आणि करिना कपूरनेदेखील या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी साऊथच्या कोणत्या अभिनेत्याबाबत काम करायला आवडेल, असा प्रश्न करणने करिनाला विचारला होता. त्यावेळी तिने यश बरोबर काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले.

करिनाला प्रभास, राम चरण, विजय देवरकोंडा, अल्लू अर्जुन आणि यश यापैकी एकाची निवड करायची होती. करिनाने यशचे नाव घेतले होते.

करिनाने 'कॉफी विथ करण 8'मध्ये अमिषा पटेलशी वैर आणि 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीला न जाण्यामागचे कारणही सांगितले. आलियाही अनेक मुद्द्यांवर बोलली. यशबद्दल बोलायचे तर KGF आणि KGF 2 ने त्याला पॅन इंडियाचा स्टार बनवले. दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर ठरले असून आता सर्वजण यशला 'रॉकी भाई' म्हणू लागले आहेत.

बॉलिवूडमध्येही यशची खूप क्रेझ आहे. आता यश लवकरच KGF 3 मध्ये दिसणार आहे. मात्र अजूनपर्यंत केजीएफ कधी रिलीज होणार आणि कलाकारांबद्दल कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. करीना यावर्षी 'द बकिंगहॅम मर्डर्स' आणि 'जाने जान'मध्ये दिसली होती. लवकरच ती 'द क्रू' आणि 'सिंघम अगेन'मध्ये दिसणार आहे. आता करिनाची यशबरोबर काम करण्याची इच्छा कधी पूर्ण होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT