Kareena Kapoor  Instagram/@kareenakapoorkhan
मनोरंजन

Kareena Kapoor Khan: '...अन् बेबो म्हणाली कांस्य हे माझ्यासाठी नवीन सोनं' Video Viral

Kareena Kapoor Khan: पहिल्या फोटोमध्ये ती करण जोहर आणि इतर पालकांसोबत पोज देताना दिसत आहे

दैनिक गोमन्तक

Kareena Kapoor Khan: बॉलीवूडचे कलाकार नेहमी चर्चेत असतात. कधी आपल्या चित्रपटांमुळे तर कधी आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता करिना कपूर आपल्या मुलामुले म्हणजेच तैमुरमुळे चर्चेत आली आहे.

19 जानेवारी 2024 रोजी, करीना कपूर खानने तिचा मुलगा तैमूर अली खानच्या शाळेतील एका गेम स्पर्धेतील तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये काही फोटो शेअर केले. पहिल्या फोटोमध्ये ती करण जोहर आणि इतर पालकांसोबत पोज देताना दिसत आहे जे आपल्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यक्रमाला आले होते. तिने फोटो शेअर करत लिहिले- धावपटू नसूनही तरीही विजेते आहोत.

पुढील फोटोमध्ये करीना कपूर सेल्फी घेताना दिसत आहे. तिने आपल्या मुलाचे कांस्यपदक दाखवले आणि खूप आनंदी दिसत होती. तिने या फोटोवर वर लिहले की 'होय, मी ती आई आहे जी त्याचे पदक घालते. अभिमान असलेली आई. कांस्य हे माझे नवीन सोने आहे.

यासोबतच करिनाचा एक व्हिडिओही समोर आला असून तो करण जोहरने रेकॉर्ड केला आहे. व्हिडिओमध्ये करण म्हणतो- तू पदक जिंकलेस का? तेव्हा करीना म्हणते- तैमूरने जिंकले आहे. मग त्याने विचारले - त्याने काय जिंकले आहे? करीना म्हणाली- कांस्यपदक आहे आणि माझ्यासाठी ते नवीन सोने आहे.

3 डिसेंबर 2023 रोजी, तैमूर अली खानने तायक्वांदोमध्ये आणखी एक पदक जिंकले होते. सामना संपल्यानंतर तैमूर त्याची आई करीनाकडे धावला आणि तिला मिठी मारली. करीनाला तिच्या आनंदावर नियंत्रण ठेवता आले नाही. त्यावेळी गोल्ड मेडल जिंकणाऱ्या लहान तैमूरसोबत त्याने फोटो काढलेला पाहायला मिळाले होते.

दरम्यान, तैमूर अली खान आणि जहांगीर अली खानचे जन्मापासूनच प्रचंड फॅन फॉलोइंग आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT