Kareena Kapoor's 43 th Birthday  Dainik Gomantak
मनोरंजन

HBD Kareena : मंद कँडल्स, सोबत मूनलाईट...मोठ्या बहिणीसोबत मध्यरात्री असा साजरा झाला बेबोचा वाढदिवस

बॉलीवूडची बेबो अर्थात करीना कपूर 43 वर्षांची झाली आहे. 20 सप्टेंबरच्या मध्यरात्री तिने आपला वाढदिवस साजरा केला.

Rahul sadolikar

Kareena Kapoor Celebrates 43 th Birthday : रेफ्यूजी चित्रपटातून पदार्पण केलेली करीना सुरूवातीला ज्या निरागस अदांनी प्रेक्षकांना प्रेमात पाडून गेली त्याच अदा नंतर तरुणांना घायाळ करुन गेल्या.

जब वी मेट मधली दिलखुलास तरुणी, थ्री इडियट्समधली वडिल आणि प्रियकराच्या संघर्षात विनोदी पात्राने धमाल उडवून देणारी प्रिया 21 सप्टेंबर रोजी 43 वर्षांची झाली आहे.

करीश्माने शेअर केले सेलिब्रेशनचे फोटो

करीना कपूर खान (Kareena Kapoor) 21 सप्टेंबर रोजी तिचा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसाचे काही फोटो तिची मोठी बहिण अभिनेत्री करीश्मा कपूरने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहेत. चाहत्यांनीही कमेंट्स करत लाडक्या बेबोला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करीनाने तिचा खास दिवस मित्र आणि कुटुंबियांसोबत मध्यरात्री साजरा केला आणि बहीण करिश्माने पार्टीतले काही फोटो सोशल मिडीयावर (Social Media ) पोस्ट केले. 

फोटोंमध्ये, बेबो केशरी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली करिश्मा पांढर्‍या ड्रेसमध्ये ग्लॅमरस लूकमध्ये दिसली.

बेबो आणि लोलो एकत्र

करिनाची बहीण करिश्मा (Karishma Kapoor ) तिच्या वाढदिवसाला असणार नाही हे अशक्य आहे. सेलिब्रेशनच्या फोटोशूटमध्ये  दोन्ही बहिणींनी एकत्र अनेक पोज दिल्या.
दोन बहिणींमधील प्रेम आणि आपुलकी इतक्या वर्षांनंतरही तितकंच गोड आणि लोभस वाटतं. 

Kareena Kapoor's 43 th Birthday

बेबोच्या बर्थडेचं लोकेशन

बेबो आणि लोलो या बॉलीवूडच्या सर्वात प्रसिद्ध आणि यशस्वी कुटूंबापैकी एक असणाऱ्या कपूर कुटूंबातून आल्या आहेत. शोमन राज कपूर यांचा वारसा दोघी समर्थपणे पुढे चालवत आहेत.

करीना कपूरने तिच्या 43 व्या वाढदिवसानिमित्त केक कापला आणि तिच्या सेलिब्रेशनचे लोकेशन तिच्या चाहत्यांना फोटोद्वारे दाखवले.

Kareena Kapoor's 43 th Birthday

केकवर लिहिले होते 'जाने जा'

करिश्माने बेबोच्या वाढदिवसाच्या केकचा फोटोही पोस्ट केला होता, ज्यामध्ये 'जाने जान' चित्रपटाचे नावही लिहिले होते.
यासोबतच करिश्मा कपूरने त्या ठिकाणाची झलकही दाखवली जिथे सर्वांनी मिळून बेबोचा खास दिवस साजरा केला. 

हे लोकेशन करीनाच्या चाहत्यांनाही प्रचंड आवडल्याचे सोशल मिडीयावरच्या कमेंटसवरुन दिसतं. बॅकग्राऊंडला पसरलेल्या चंद्रप्रकाशात करीनाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Kareena Kapoor's 43 th Birthday

करीनाचा जाने जा

सध्या करीना वर्कफ्रंटवर तिच्या 'जाने जा' या वेब फिल्ममुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटात एका रहस्यमयी घटनेचा शोध घेण्यात येतो.

माया (करीना कपूर खान), नरेन (जयदीप अहलावत) आणि करण (विजय वर्मा) एकमेकांपासून लपवत आणि काहीतरी पुरावा शोधण्याच्या विचित्र प्रवासाची गोष्ट हा चित्रपट सांगतो. जाने जा चा ट्रेलरमधुन सध्या तरी एवढंच सांगता येईल. 

'जाने जान' 21 सप्टेंबरला OTT वर प्रदर्शित होत आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर तुमच्या मनात काय आले?

Goa IIT Project: रिवण, कोडारही गेले! गोव्यात 'आयआयटी'साठी मिळेना जागा; तंत्रशिक्षण खाते जमिनीच्या शोधात

Goa ZP Election: भाजपच्या पहिल्या यादीत नवख्यांना संधी! मगोसाठी जागा राखीव; काँग्रेस–फॉरवर्ड- आरजीपीचे तळ्यात मळ्यात

Horoscope: कामात थोडा विलंब परंतु प्रयत्न यशस्वी, आज संयम आवश्यक; वाचा तुमच्या राशीचे भविष्य

Illegal Fishing: जप्त केलेल्या गोव्याच्या त्या 2 ट्रॉलर्सचा ताबा महाराष्ट्राकडेच! 'एलईडी मासेमारी' खपवून घेणार नाही, मंत्री नितेश राणेंची कडक भूमिका

Man Falls in Well: कारापूर वाठारांत बांयत पडील्ल्या तरणाट्याक वाचोवपाक उजो पालोवपी दळाक येस

SCROLL FOR NEXT