Kapil Sharma had a hard time screwing up Sunny Deols son Karan Deol Dainik Gomantak
मनोरंजन

कपिल शर्माने घेतला सनी देओलच्या कुटुंबाशी पंगा आणि...

दैनिक गोमन्तक

द कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) दर आठवड्याला हास्याचा जबरदस्त डोस पाहायला मिळतो. चाहते या शोची आतुरतेने वाट पाहत असतात. शोमध्ये आलेल्या गेस्टसोबत कपिलची मस्ती पाहून हसताना लोकांच्या पोटात दुखते. अभिनेता सनी देओल (Sunny Deol) या आठवड्यात कपिलच्या शोमध्ये मुलगा करण देओल सोबत (Karan Deol) 'वेले' (Velle) या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. ज्याचा प्रोमो समोर आला आहे. सनी पाजीसोबत कपिल या एपिसोडमध्ये खूप धमाल-मस्ती करताना पाहायला मिळणार आहे.

समोर आलेल्या या शोच्या प्रोमोमध्ये कपिलला सनी देओलचा मुलगा करणची खिल्ली उडवणे महागात पडणार आहे. सनी देओल स्वतः आपल्या मुलासाठी सेटवर येतो, जे पाहून कपिल घाबरला. प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की कपिल देओल कुटुंबाच्या नृत्य कौशल्याची खिल्ली उडवताना करण तुझे आजोबा धर्मेंद्र जी, काका बॉबी देओल आणि पापा सनी देओल यांना विचारतो की, तू डान्समध्ये कोणाला फॉलो करतोस मला कि तुझ्या पपांना, करण हाक मारतो. त्याच्या वडिलांना आणि सनीचा मोठा आवाज घुमू लागतो.. "हो काय झालं ... काय झालं.." हे ऐकून कपिल घाबरतो, संपूर्ण सेट हादरायला लागतो आणि सनीची सेटवर एन्ट्री होते.

सनीच्या आगमनानंतर वातावरण खूपच मजेदार बनते. यापेक्षा चांगला डान्स कोणीच करू शकत नाही असे सनी म्हणते आणि त्याने त्याचे सुपरहिट गाणे यारा ओ यारा स्टेप बाय स्टेप दाखवले. एवढेच नाही तर करण देओलने त्याचे अनेक सुपरहिट डायलॉग्स वडिलांसमोर कथन केले आहेत, ज्यामुळे प्रत्येकजण खूपच प्रभावित झालेला दिसतो. एकूणच हा एपिसोड खूप धमाकेदार असणार आहे. वेले हा करण देओलचा दुसरा चित्रपट आहे. त्याने 2019 मध्ये पल पल दिल के पास या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: DNA चाचणी मागणीचा वाद; कोलवा सर्कल ब्लॉक, वाहतूक वळवली!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

Margaon Municipality: बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करा; महेश अमोणकरांची मागणी

Mhadei Water Dispute: म्हादईवर वक्रदृष्टी कायम! कर्नाटक सरकारच्या 'करनाटकी वृत्ती'वर पर्यावरणप्रेमी केरकर स्पष्टच बोलले

St. Francis Xavier DNA चाचणी मागणीने गोव्यात धार्मिक तेढ; हिंदुवादी संघटना, ख्रिस्ती समाजाचे राज्यभर मोर्चे, वातावरण तंग

SCROLL FOR NEXT