Kangana Ranaut Dainik Gomantak
मनोरंजन

महादेव ॲप प्रकरणात अडकलेल्या सेलिब्रिटींवर बरसली कंगना...

अभिनेत्री कंगना रणौतने आपल्या बेधडक बोलण्याची प्रचिती पुन्हा एकदा दिली आहे.

Rahul sadolikar

Kangana Ranaut : अभिनेत्री कंगना रणौत आपल्या बेधडक स्वभावासाठी प्रसिद्ध आहे. आजवर कंगनाने कुणाचाही मुलाहिजा ठेवला नाही मग तो करन जोहर असो किंवा आलिया भट्ट.

कंगनाने आता पुन्हा आपल्या तीक्ष्ण वाणीचे शस्त्र उपसले आहे. यावेळी कंगनाच्या निशाण्यावर महादेव अॅपच्या प्रकरणात अडकलेले सेलिब्रिटी आहेत.

हे कलाकार आहेत रडारवर

महादेव अ‍ॅप हे प्रकरण सध्या देशभरात चांगलंच चर्चेत आलं आहे. या प्रकरणामुळे मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध कलाकारदेखील ईडीच्या रडारवर आहेत. ज्यात रणबीर कपूर, कपिल शर्मा, हुमा कुरेशी आणि हिना खान, अमिषा पटेल, श्रद्धा कपूर, सोनाक्षी सिन्हा, इम्रान हाश्मी, बोमन इराणी, कॉमेडियन भारती सिंग आणि नेहा कक्कर यांचा समावेश आहे.

ईडी करणार चौकशी

जाळ्यात सापडलेल्या या कलाकारांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागू शकतं. ईडीने सांगितल्यानुसार या स्टार्सनी या अ‍ॅप्सची जाहिरात केली आहे. त्यांच्या प्रमोशनल इव्हेंटमध्येही या कालाकारांचा सहभाग झाला आहे. त्यामुळे आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे.

कंगना रणौतचं वक्तव्य चर्चेत

त्यातच आता बॉलिवूडची पंगा क्विन कंगना राणौतचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. महादेव बेटिंग अ‍ॅपच्या प्रमोशनसाठी तिला करोडो रुपयांची ऑफर देण्यात आली होती मात्र कंगनाने ती ऑफर आणि या अ‍ॅपची जाहिरात करण्यास नकार दिल्याचा खुलासा केला.

इतकच नाही तर आता कंगना रणौतने महादेव अ‍ॅप प्रकरणात सहभागी असलेल्या सेलिब्रिटींवरही निशाणा साधला आहे.

Kangana Ranaut

कंगनाची इन्स्टाग्रामवरची पोस्ट

कंगना रणौतने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर याबाबच एक पोस्ट शेयर केली आहे. एका बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत कंगना लिहिते की, “हे एंडोर्समेंट मला एका वर्षात जवळपास 6 वेळा आलं, प्रत्येक वेळी मला खरेदी करण्यासाठीच्या या ऑफरमध्ये अनेक कोटी रुपये जोडले पण मी प्रत्येक वेळी नाही म्हणाले.

आणि आता बघा, हो प्रामाणिकपणा आता फक्त तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीसाठी चांगला नाही, हा नवा भारत आहे, स्वतःला सुधरवा नाहीतर तुम्हाला वठणीवर आणण्यात येईल."

महादेव अ‍ॅप नेमकं आहे काय?

महादेव अ‍ॅपमध्ये पोकर, चान्स गेम्स, बॅडमिंटन, टेनिस, फुटबॉल, क्रिकेट आणि कार्ड गेम यांसारख्या अनेक ऑनलाइन गेमवर बेटिंग केली जाते.

हे अ‍ॅप दुबईचे सौरभ चंद्राकर आणि रवी उरपल चालवत होते. या वर्षी फेब्रुवारीमध्ये महादेव अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी सौरभ चंद्राकरच्या विवाह सोहळ्यात अनेक कलाकारांनी सहभाग घेतला होता.

आता या कलाकारांती चौकशी करण्यात येणार आहे. त्यातच आता कंगना रणौतने महादेव अ‍ॅप प्रकरणात सहभागी असलेल्या सेलिब्रिटींवर निशाणा साधला आहे.

Zilla Panchayat Election: गोवा फॉरवर्ड, ‘आप’कडून जोर, काँग्रेस स्‍वस्‍थच! जिल्‍हा पंचायत निवडणूक; सरदेसाईंकडून उमेदवार चाचपणी

Margao: शांततेसाठी घेतले घर! तळमजल्‍यावरील रेस्‍टॉरंटमुळे वृद्ध व्यक्ती तणावाखाली; 'मानवाधिकार'ने दिला दिलासा; वाचा संपूर्ण प्रकरण..

Goa: ‘उत्कृष्ट शिक्षक’ प्राध्यापकास पूर्ण सेवावाढ, सर्व लाभ द्या! गोवा विद्यापीठाला न्यायालयाकडून मुदतवाढीचे निर्देश

Goa News Live: अमित शहा आज गोव्यात, विविध विकासकामांचे करणार उद्घाटन

Mayem: 250 वर्षांपासूनची परंपरा, पोर्तुगीज काळापासून होतेय मयेतील ‘मेस्तां’च्या शाळेत सरस्वती पूजन

SCROLL FOR NEXT