Lock -up Season 2 Kangana Ranaut  Dainik Gomantak
मनोरंजन

Lock-Up Season 2 : हे 6 सेलिब्रिटी जाणार 'कंगना रणौत'च्या जेलमध्ये...लॉक -अप सीजन 2 लवकरच

कंगना रणौतच्या लॉक-अप मध्ये सिझन 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Rahul sadolikar

अभिनेत्री कंगना रणौत आजकाल बातम्यांच्या हेडींगमध्ये नसली की तिच्या चाहत्यांनाही चैन पडत नाही. कंगना रणौत सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असते. आता पहिल्या सीझन नंतर लॉक -अप सीझन 2 प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

चाहते कंगना रणौतच्या लॉक अप शोच्या सीझन 2 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉसच्या १६व्या सीझननंतर या सीझनमध्ये काही खास घडणार आहे का याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

पहिल्या यशस्वी सीझननंतर, आता निर्माते तयारीला लागले आहेत आणि ते दुसऱ्या सीझनसाठी त्यांच्या शोसाठी एकापेक्षा जास्त सेलिब्रिटी स्पर्धकांशी संपर्क साधत आहेत. कंगना रणौतच्या या वादग्रस्त शोसाठी आत्तापर्यंत अनेक कलाकारांची नावे समोर आली आहेत. त्यापैकी सहा सेलिब्रिटी स्पर्धक शोमध्ये येण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

कंगना रणौतचा लॉक अप हा शो इतर वादग्रस्त शोपेक्षा किती वेगळा आहे, हे आपण ओटीटीवरील पहिल्या सीझनमध्ये चांगलेच पाहिले आहे. आता दुसरा सीझन प्रेक्षकांसाठी आणखी रोमांचक करण्यासाठी निर्माते कोणतीही कसर सोडत नाहीत. एकता कपूर तिच्या रिअॅलिटी शोसाठी एकापेक्षा एक प्रसिद्ध आणि वादग्रस्त स्टार्सकडे येत आहे.

आता बिग बॉस खबरीने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सहा कन्फर्म केलेल्या स्पर्धकांची नावे शेअर केली आहेत. 

यामध्ये  'ये है मोहब्बतें' फेम अली गोनी, पारस छाबरा, राखी सावंत, एमेवे बंताई, दिव्या अग्रवाल आणि उमर रियाझ हे सहा सेलिब्रिटी स्पर्धक आहेत अशी माहिती मिळाली आहे. या सर्वांना 'लॉक अप 2' शोसाठी निश्चित करण्यात आले आहे. मात्र, अद्याप याबाबत निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Guhagar Accident: गुहागर-चिपळूण मार्गावर अपघात! रत्नागिरीकडे येणारा टेम्पो उलटला, रस्त्यावर विखुरले मासे; वाहतूक काहीकाळ ठप्प

Ronaldo Goa Visit: फुटबॉलप्रेमींचा हार्टब्रेक! अल नासर गोव्यात दाखल; ख्रिस्तियानो रोनाल्डो अनुपस्थित, चाहते नाराज

Narkasur Chor: गोव्यात 'नरकासुरच पळवला'!! भल्या पहाटे दुचाकीवरून नेला चोरून, व्हिडीओ पाहून हसू आवरेना; Watch Video

Pakistan ODI Captain: पाकिस्तान क्रिकेट क्षेत्रात खळबळ! रिजवानची केली हकालपट्टी; 'या' आक्रमक गोलंदाजाच्या हाती दिले नेतृत्व

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

SCROLL FOR NEXT