Maldives: पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर अनेक चर्चा होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी -लक्षद्वीप- मालदीव हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मोदींनी लक्षद्वीपच्या बीचचे फोटो शेअर करत ज्यांना अॅडव्हेंचर अनुभवायचे आहे, त्यांच्या लिस्टमध्ये मालदीव असायला हवे अशा आशयाचे ट्वीट नरेंद्र मोदींनी केले होते. या ट्वीटवर मालदीवच्या मंत्र्यांनी अपमानजनक ट्वीट केले आणि त्यानंतर वादाला सुरुवात झाली.
भारत मालदीव वादात बॉलीवूडच्या अनेक कलाकारांनी उडी घेतली आहे. आता कंगनाने रणौतनेदेखील आपले मत मांडले आहे. एका मुलाखतीत या मुद्द्यावर बोलताना कंगना म्हणते ' पंतप्रधान लक्षद्वीपमध्ये पर्यटनाला चालना देत आहेत आणि लोक त्याबद्दल ज्या प्रकारचे ट्विट करत आहेत ते चुकीचे आहे. सर्व प्रथम, त्यांनी फक्त लक्षद्वीपच नव्हे तर आपल्या देशाचा प्रचार केला, लग्न करण्यासाठी भारताची निवड करण्याचा प्रयत्न करा असे त्यांनी वारंवार सांगितले आहे. स्वावलंबी भारत घडवणे हा त्यांचा अजेंडा आहे. तसेच मला वाटते की यामुळे मालदीवमधील पर्यटन कमी होईल हा केवळ एक समज आहे.
कंगना पुढे म्हणाली, 'लोक काश्मीरला गेले तर याचा अर्थ मनालीतील पर्यटन कमी होईल, असे नाही. त्याबरोबरच कंगनाने याबाबत ट्वीट देखील केले होते, काही लोकांना फक्त महागडे रिसॉर्ट किंवा फक्त सोयीसुविधा यासाठी पर्यटन आवडत नाही, तर त्यांना निसर्ग अनुभवायचा असतो. लक्षद्वीपची लोकसंख्या कमी असल्याने तिथला बहुतांश परिसरात आजपर्यंत कोणीही गेले नाही अशा भागात जायला लोकांना आवडेल असेही कंगनाने म्हटले होते.
सोशल मीडियावर मालदीववर बहिष्कार टाका या ट्रेंडनंतर, मालदीव सरकारने भारताविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल आपल्या तीन मंत्र्यांना निलंबित करण्याची घोषणा केली आहे. मालदीव आणि भारत हे शेजारी राष्ट्र आहे. त्यांचे सुरक्षिततेचे मुद्देदेखील सारखे आहेत. ज्या ज्या वेळी मालदीव अडचणीत सापडला आहे. त्या त्या वेळी भारताने सर्वप्रथम मदत केली. संरक्षण क्षेत्रातदेखील मालदीव सक्षम व्हावा यासाठी भारताने अनेक प्रयत्न केले आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.