Kangana Ranaut Dainik Gomantak
मनोरंजन

Himachal Pradesh Elections: कंगना म्हणते, 'माझे वडील सकाळ-संध्याकाळ जय मोदी-योगी म्हणतात...'

Kangana Ranaut: काही वेळापूर्वी कंगनाने राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचीही भेट घेतली आहे.

दैनिक गोमन्तक

Himachal Pradesh Elections: हिमाचल प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. दरम्यान बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौतची राजकीय इनिंग सुरु होईल, अशी अटकळ काही दिवसांपासून होती. काही वेळापूर्वी कंगनाने राज्याचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची भेटही घेतली आहे. एका कार्यक्रमात बोलताना कंगना म्हणाली की, 'मी लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात येण्यास तयार आहे.'

दरम्यान, कंगनाने कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचे कौतुक करतानाच राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर ताशेरे ओढले. कंगना पुढे म्हणाली की, 'राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात तुलनाच होऊ शकत नाही.' दुसरीकडे, अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांची खिल्ली उडवत कंगना म्हणाली की, 'हिमाचलच्या लोकांना मोफत वीज नको आहे. येथील लोक स्वतःची वीज बनवतात.'

कंगना राजकारणात येण्यास तयार

कंगना पुढे म्हणाली की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा महान माणूस इतिहासात एकदाच येतो.' शनिवारी कंगना इंडिया टुडे कार्यक्रमात पोहोचली होती. राजकारणात येण्याच्या प्रश्नावर कंगना म्हणाली की, 'परिस्थिती कशीही असेल, सरकारला माझा सहभाग हवा आहे, मी ते करेन. मी माझ्या सहभागासाठी तयार आहे.' कंगना पुढे म्हणते की, 'मी म्हटल्याप्रमाणे खूप छान होईल. हिमाचल प्रदेशच्या (Himachal Pradesh) लोकांनी मला सेवेची संधी द्यावी.'

आता कुटुंबाचा भाजपला पाठिंबा आहे

कंगनाचे कुटुंबीय यापूर्वी काँग्रेसचे (Congress) समर्थक राहीले आहेत. कंगना म्हणाली की, 2014 मध्ये मोदीजी आल्यानंतर माझ्या कुटुंबात अचानक बदल झाला. माझ्या वडिलांनी मला पहिल्यांदा मोदीजींबद्दल सांगितले आणि 2014 मध्ये आम्ही अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला.' कंगना पुढे म्हणते की, 'आता माझे वडील सकाळी जय मोदी जी आणि संध्याकाळी झोपताना जय योगी जी म्हणायचे. त्यांनी पूर्णपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT