संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई काठियावाडी' या चित्रपटाची चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वांनाच 'गंगूबाई फिव्हर'चा त्रास होत आहे. आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या चित्रपटातील एक संवाद इन्स्टाग्राम रील वर खूप वापरला जात आहे. अशा स्थितीत गंगूबाईचा अवतार घेऊन लोक त्यावर रिल करत आहेत. नुकताच आणखी एक व्हिडिओ समोर आला असून तो सध्या चर्चेचा विषय बनला आहे. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे पण कंगना (Kangana Ranaut) या व्हिडिओमध्ये खूप त्रासलेली दिसत आहे. (Gangubai Instagram Reals Latest News)
'गंगूबाई'च्या या इस्टा रीलवर कंगनाचा आक्षेप, स्मृती इराणींना पोस्टवर टॅग
कंगनाने या व्हिडिओबद्दल चिंता व्यक्त केली आहे. खरंतर हा व्हिडिओ एका लहान मुलीचा आहे. व्हिडिओमध्ये, मुलगी आलिया भट्टसारखी वागते आणि गंगूबाईचे डायलॉग उत्तम प्रकारे लिप सिंक करते. आलिया भट्ट तोंडात बीडी हातात घेउन मूळ व्हिडीओमध्ये डायलॉग बोलत आहे, ही चिमुरडीही तिच्या रीलमध्ये त्याच स्टाइलमध्ये बोलत आहे. आलियाप्रमाणेच पांढरी साडी आणि बिंदी घातलेली मुलगी तिच्या वयापेक्षा मोठे डायलॉग बोलते, जणू तिचे शब्द तिला नीट कळले आहेत. यावर आक्षेप घेत कंगनाने 'हे बरोबर आहे का?', असा प्रश्न विचारला आहे.
मुलीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कंगना काय म्हणाली?
तिच्या स्टोरीवर हा व्हिडिओ पोस्ट करत कंगनाने लिहिले- 'या मुलीने सेक्स वर्करप्रमाणे नक्कल करावी का, तोंडात बिडी टाकावी आणि अश्लील डायलॉगबाजी करावी का? फक्त तीची देहबोली पहा. ते तीच्या वयासाठी चांगले आहे का? येथे आणखी 100 मुले आहेत जी हे करत आहेत.'' कंगनाने या स्टोरीवर स्मृती इराणी यांनाही टॅग केले आहे. आणखी एक मुलगी आहे जी आलियाच्या या डायलॉगमध्ये लिप सिंक करून खूप लोकप्रिय झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.