Kangana Ranaut| emergency  Instagram
मनोरंजन

Kangana Ranaut च्या 'Emergency ' मधील सतीश कौशिकचा फर्स्ट लूक आउट

अभिनेता सतीश कौशिकचा कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात जगजीवन रामची भूमिका साकारत आहे.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता कंगनाने 'इमर्जन्सी' चित्रपटातील आणखी एका पात्राचा लूक शेअर केला आहे. कंगनाच्या इमर्जन्सीमध्ये अभिनेता सतीश कौशिक जगजीवन रामची भूमिका साकारत आहे. पोस्टरमध्ये अभिनेता सतीश कौशिकचा लूक हुबेहुब जगजीवन रामसारखा दिसत आहे.

कंगना रणौतने आज 'इमर्जन्सी' (Emergency) चित्रपटातील नवीन पात्राचा फर्स्ट लूक पोस्टर सोशल मीडियावर शेअर केला आहे. 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या या पोस्टरमध्ये अभिनेता सतीश कौशिक राजकारणी जगजीवन रामच्या लूकमध्ये दिसत आहे. या फोटोमध्ये खादीची टोपी आणि जॅकेट घातलेला, चेहऱ्यावर काळा चष्मा घातलेला, हुबेहुब जगजीवन राम सारखे दिसत आहे.

सतीश कौशिकच्या या पोस्टरसोबत कंगना रणौतने एक मोठे कॅप्शनही लिहिले आहे. चित्रपटाच्या या लेटेस्ट पोस्टरच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे – लास्ट बट नॉट द कम…. आणीबाणीच्या काळात जगजीवन राम म्हणून प्रतिभावान सतीश कौशिकचे पॉवरहाऊस सादर करणारे, बाबूजी म्हणून प्रसिद्ध असलेले, ते भारतीय राजकीय इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक होते.

'इमर्जन्सी' चित्रपटाच्या माध्यमातून देशातील सर्वात मोठी राजकीय घटना पडद्यावर आणली जाणार आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार 25 जून 1975 रोजी देशभरात आणीबाणी घोषित करण्यात आली होती. जगजीवन राम यांनी जयप्रकाश नारायण यांच्यासमवेत त्या वेळी इंदिरा गांधींच्या विरोधात देशव्यापी आंदोलन सुरू केले. ज्यामध्ये सर्व विरोधी पक्ष एकत्र आले आणि इंदिरा गांधींच्या विरोधात आंदोलनात उतरले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

SCROLL FOR NEXT