Chandramukhi First Look Dainik Gomantak
मनोरंजन

Chandramukhi First Look : नव्या अवतारातली पंगा क्वीन पाहिलीत का? कंगना रणौतच्या चंद्रमुखीचा फर्स्ट लूक रिलीज...

अभिनेत्री कंगना रणौतचा आगामी चंद्रमुखी चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज झाला आहे.

Rahul sadolikar

अभिनेत्री कंगना रणौतची पंगा क्वीन आज पुन्हा चर्चेत आली आहे, यावेळी ती तिच्या वादग्रस्त विधानामुळे नाही तर एका चित्रपटाच्या फर्स्ट लूकमुळे चर्चेत आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही पंगा क्विन म्हणुन ओळखली जाते. ती तिच्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असते. ती तिच्या अभिनयानाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. सध्या कंगना तिच्या चंद्रमुखी 2 या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

चंद्रमुखीचा फर्स्ट लूक

चंद्रमुखी 2' मधील कंगना राणौतचा फर्स्ट लूक समोर आला आहे. कंगनाला या लूकमध्ये पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत. यासोबत तित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही निर्मात्यांनी शेयर केली आहे. हा चित्रपट सप्टेंबर महिन्यात गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. तो साऊथच्या ब्लॉकबस्टर सिनेमाचा सिक्वेल आहे.

कंगनाचा लूक व्हायरल

कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर 'चंद्रमुखी 2' चा पहिला लूक शेअर करत कॅप्शन लिहिले आहे, 'सौंदर्य आणि पोझ. चंद्रमुखी २ मधील कंगना राणौतचा फर्स्ट लूक. '

कंगनाचा हा लूक प्रेक्षकांना खुप आवडला आहे. कंगनाचा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये रिलिज होणार आहे.

चंद्रमुखीचा सिक्वल

'चंद्रमुखी 2' सिनेमा बद्दल बोलायचं झालं तर हा सिनेमा 2005 साली आलेल्या चंद्रमुखीच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचा सिक्वेल आहे.

चंद्रमुखीच्या पहिल्या भागात रजनीकांत डॉ. सरवणन आणि वेट्टय्यान राजा यांच्या भूमिकेत होते. तर ज्योतिका ही 'चंद्रमुखी'च्या भुमिकेत होती. चंद्रमुखी 2 वेट्टय्यान राजा आणि कंगना चंद्रमुखीच्या भूमिकेत या चित्रपटातुन प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहे.

कंगना राणौतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच तिच्या 'इमर्जन्सी' आणि 'तेजस' चित्रपटात दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Merces: ..मध्यरात्री मडगावकडे जाणारी बस पेटली! मेरशी सर्कलजवळ घडली थरारक घटना; पर्यटकांची जीव वाचविण्यासाठी धडपड

Assagao Raid: आसगावात 7.30 लाखांचा गांजा जप्‍त; जम्मू काश्मीरच्या व्यक्तीला अटक; सात लाखांची रोकड जप्त

Rashi Bhavishya 04 August 2025: मान-सन्मान मिळू शकतो, वरिष्ठांचा सल्ला उपयोगी ठरेल; करिअरमध्ये सुधारणा

गोवा आणि सिंधुदुर्ग संबंध अधिक दृढ होणार, तवडकरांनी घेतली नारायण राणेंची भेट; विकासावर केली चर्चा!

"घे रे पातोळ्यो खाया सगळेजाण" मुख्यमंत्र्यांना 'खाऊचा डब्बा' देणाऱ्या चिमुकलीचा Video Viral

SCROLL FOR NEXT