Kangana Ranaut Emergency Controversy Dainik Gomantak
मनोरंजन

कंगना रणौतची 'इमर्जन्सी' वादाच्या भोवऱ्यात, काँग्रेसचा आक्षेप, अभिनेत्रीसमोर ठेवली ही अट!

कंगना रणौतचा आगामी चित्रपट इमर्जन्सी सध्या चर्चेचा विषय आहे. मात्र इमर्जन्सी आता वादात अडकलेला दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

Kangana Ranaut Emergency Controversy: हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज कंगना रणौतचा आगामी चित्रपट इमर्जन्सी सध्या चर्चेचा विषय आहे. मात्र इमर्जन्सी आता वादात अडकलेला दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंगनाच्या आणीबाणी चित्रपटावर इंडियन नॅशनल काँग्रेस (INC) ने आक्षेप घेतला आहे. तसेच कंगना राणौतसमोर पक्षाने मोठी अट ठेवली आहे. कंगनच्या या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजवटीत 1975-77 या काळात देशात आणीबाणीची कहाणी दाखवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

कंगनाचा 'इमर्जन्सी' वादात सापडला आहे

विशेष म्हणजे मध्य प्रदेशातील काँग्रेस पक्षाने बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतच्या इमर्जन्सी चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, 'इमर्जन्सी' या चित्रपटातून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसने कंगना राणौतसमोर अट ठेवली आहे की, तिला आधी इमर्जन्सी चित्रपट दाखवावा लागेल. याशिवाय एमपी काँग्रेस मीडिया विभागाच्या उपाध्यक्षा संगीता शर्मा यांनीही 'कंगना रणौत ही भाजपची एजंट आहे आणि सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेशी खेळण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले आहे.

'इमर्जन्सी'चा टीझर रिलीज

काँग्रेसला फटकारताना भाजपचे राज्याचे प्रवक्ते राजपाल सिंह यांनी ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर विरोधी पक्षात खळबळ माजली असल्याचे मत व्यक्त केले आहे. कारण माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजवटीत देशावर आणीबाणी लादल्या गेली होती. कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचा टीझर आधीच रिलीज झाला आहे, ज्यामध्ये कंगना इंदिरा गांधींच्या लूकमध्ये दिसत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narendra Sawaikar Post Controversy: तरुणांना 'वाळवी' संबोधल्याने गोव्यात राजकीय रणसंग्राम! सावईकरांच्या विधानावर काँग्रेस आक्रमक; माफी मागा, अन्यथा...

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT