Kajol and Ajay Devgan Dainik Gomantak
मनोरंजन

Kajol-Ajay Devgan: काजोल अन् अजय देवगणने लेकीच्या शुभेच्छांना दिले अनोखे उत्तर

Kajol-Ajay Devgan: अजयने काजोलच्या खांद्यावर हात ठेवला आहे. 'तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद' असे कॅप्शन लिहिले आहे.

दैनिक गोमन्तक

Kajol Ajay Devgan 25th Anniversary Nyasa posted story for them

बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच चर्चेत असतात. कारण कोणतेही असो वैयक्तिक किंवा प्रोफेशनल दोन्ही गोष्टीमुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता अजय देवगण आणि अभिनेत्री काजोल यांच्या लग्नाला आज २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. मात्र चर्चा मात्र त्यांच्या लेकीने दिलेल्या शुभेच्छांची होताना दिसत आहे.

काजोल आणि अजय देवगण यांच्या मुलीने म्हणजेच न्यासा देवगणने सोशल मिडियावर या आपल्या आई-वडीलांचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महत्वाचे म्हणजे काजोल आणि अजय देवगण या दोघांनीही लेकीच्या शुभेच्छांना मजेशीर उत्तर दिले आहे.

काजोलने तिची स्टोरी रिपोस्ट करत त्यावर 'लव्ह यू... रिझल्ट' असे लिहले आहे. त्यासोबत डोळे मिचकावणारा इमोजी जोडला. तर अजय देवगणने लिहिले, 'आणि तू आमच्यासाठी सर्वोत्तम भेट आहेस.' त्याने रेड हार्ट इमोजी देखील जोडले. याशिवाय अजयने न्यासाला आणखी एका स्टोरीवर उत्तर दिले. मुलीने लिहिले की कदाचित या वर्षापासून तुम्ही 35 वर्षांचे दिसणे बंद कराल. यावर अभिनेत्याने लिहिले, तुला 25 म्हणायचे आहे.

Ajay devgan

अजय देवगण आणि काजोलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी सर्वांकडून मिळालेल्या शुभेच्छांवर व्यक्त होताना धन्यवाद म्हटले आहे. त्याने दोन फोटो शेअर केले आहेत, ज्यात ते दोघे एकत्र बसलेले आहेत. अजयने काजोलच्या खांद्यावर हात ठेवला आहे. 'तुमच्या शुभेच्छा आणि प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद' असे कॅप्शन लिहिले आहे. यानंतर तनिषा मुखर्जी, शिल्पा शिरोडकर, अमृता अरोरा आणि इतरांनी या जोडप्याला शुभेच्छा दिलेल्या दिसून येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

Vishwajit Rane: ..तर वेगळा 'गोवा' पाहायला मिळेल! आरोग्यमंत्री राणेंचे स्वच्छता अभियान; पणजी बसस्‍थानकावर केली साफसफाई

Goa Rain: सांगितला पाऊस, पडले 'कडकडीत' ऊन! ‘यलो अलर्ट’ घेतला मागे; 4 दिवस मध्यम पावसाची शक्यता

Goa Live Updates: दुचाकीस्वारावर झाड कोसळले

Ramen Health Risks: नूडल्स वाढवतात अकाली मृत्यूचा धोका? जपान विद्यापीठांच्या नव्या अभ्यासात धक्कादायक माहिती उघड

SCROLL FOR NEXT