Kabir Singh Sequel
Kabir Singh Sequel Dinik Gomantak
मनोरंजन

Shahid Kapoor: शाहीद कपूरच्या 'कबीर सिंह'चा सिक्वेल लवकरच येणार चाहत्यांच्या भेटीस

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील अभिनेता शाहीद कपूर याचा 'कबीर सिंह' (Kabir Singh) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कामे केली होती. हा चित्रपट 250 कोटींच्या क्लबमध्ये सामिल झाला असून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 'कबीर सिंह' नंतर भूषण कुमार आणि मुराद खेतानी या जोडीने 'भूल भुलैया 2' हा चित्रपटावर लक्ष केंद्रीत केले. सध्या हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलीच धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, भूषण कुमार यांनी 'कबीर सिंह'च्या सिक्वेलसंदर्भात माहिती दिली आहे. (Kabir Singh Sequel News)

'कबीर सिंह 2','आशिकी 3' आणि 'भूल भुलैया 3'लवकरच चाहत्यांच्या भेटीस

एका मुलाखतीत भूषण कुमार यांनी सांगितले, कबीर सिंह प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. यामुळे आता 'कबीर सिंह'च्या सिक्वेलसंदर्भात विचार सुरू आहे. भूषणच्या या वक्तव्यावर मुराद खेतानींनीदेखील संमती दर्शवली आहे. मुराद खेतानी म्हणाले, 'कबीर सिंह'चा सिक्वेल येऊ शकतो. 'कबीर सिंह 2','आशिकी 3' आणि 'भूल भुलैया 3'लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल. योग्यवेळ आली की अधिकृत घोषणा करण्यात येईल."

'कबीर सिंह' हा 'अर्जुन रेड्डी' या दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक आहे. भूषण कुमार आणि मुराद खेतानीचा 'अॅनिमल' हा चित्रपट (Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रणबीर सिंह, रश्मिका मंदाना, अनिल कपूर आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. संदीप रेड्डी वांगा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

* 2019 मधील सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट

वीस दिवसांमध्ये 'कबीर सिंह' या चित्रपटाने 246.28 कोटी रुपयांची कामे केली होती. यासोबतच विकी कौशलच्या 'उरी' चित्रपटाचा विक्रम मोडित काढत 'कबीर सिंह' हा 2019 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. शाहीद कपूरसह कियारा अडवाणी, मुख्य भूमिकेत होती.

तर 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटामध्ये विजय देवराकोंडा याने मुख्य भुमिका साकारली होती. त्याच भुमिकेत शाहिद कपुर दिसणार आहे. तर अभिनेत्री कियारा अडवाणीने (Kiara Advani) या सिनेमात शाहिद कपूरच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संदीप वांगा यांनी केलं आहे. अर्जुन रेड्डी या चित्रपटाचं देखील लेखन/दिग्दर्शन संदीप यांनी केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Goa News: गोव्यात लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेले मंत्री, पोलिसांवर राजकीय दबाव; इंडिया आघाडीचा आरोप

Ponda Murder Case: सांताक्रुज, फोंड्यात मामाकडून भाच्याचा खून

Canada PM Justine Trudeau: जस्टिन ट्रुडो यांच्यासमोर 'खलिस्तानी घोषणा'; भारताने कॅनडाच्या राजदूताला बोलावून नोंदवला निषेध

दोन महिन्यात कसे वाढवले 40 हजार फॉलोअर्स, गोव्याच्या इन्फ्लुएन्सरने शेअर केलं सिक्रेट

Sahil Khan Arrested: गोव्यासह पाच राज्यातून दिवस-रात्र प्रवास; बेटिंग घोटाळ्यात अडकलेला साहिल खान अखेर गजाआड

SCROLL FOR NEXT