'पृथ्वीराज' चित्रपटाचे नाव बदलणार, यशराज स्टुडिओने मान्य केली करणी सेनेची मागणी

'पृथ्वीराज' चित्रपटाचे नाव बदलून 'सम्राट पृथ्वीराज' करण्याची मागणी
akshay kumar prithviraj name will be change yash raj studio accepts the demand of karni sena
akshay kumar prithviraj name will be change yash raj studio accepts the demand of karni senaDainik Gomantak
Published on
Updated on

पृथ्वीराज हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. रिलीजपूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. करणी सेनेने यशराज स्टुडिओकडे चित्रपटाचे नाव बदलण्याची मागणी केली होती. चित्रपटाचे नाव बदलून सम्राट पृथ्वीराज ठेवावे, अशी त्यांची इच्छा आहे. यशराज स्टुडिओने करणी सेनेचा सल्ला मान्य करत चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेने आज पुन्हा एकदा यशराज स्टुडिओचे मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय विधानी यांची भेट घेऊन 'पृथ्वीराज' चित्रपटाचे नाव बदलून 'सम्राट पृथ्वीराज' करण्याची मागणी केली. अनेक बैठकांनंतर करणी सेनेचे म्हणणे मान्य करण्यात आले असून यासंदर्भात करणी सेनेला पत्रही देण्यात आले आहे.(akshay kumar prithviraj name will be change yash raj studio accepts the demand of karni sena)

akshay kumar prithviraj name will be change yash raj studio accepts the demand of karni sena
बॉलीवुडचे 'हे' 5 स्टार कपल्स आहेत सर्वात श्रीमंत

यशराज स्टुडिओने पत्र दिले

यशराज स्टुडिओने श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे युवा अध्यक्ष श्री सुरजित सिंह राठोड यांना पत्र पाठवले आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, आम्ही चित्रपटाचे शीर्षक बदलून सम्राट पृथ्वीराज करू.

akshay kumar prithviraj name will be change yash raj studio accepts the demand of karni sena
akshay kumar prithviraj name will be change yash raj studio accepts the demand of karni senaDainik Gomantak

पृथ्वीराजबद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमारसोबत संजय दत्त, सोनू सूद आणि आशुतोष राणा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ चंद्रप्रकाश द्विवेदी यांनी केले आहे. हा चित्रपट ३ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या एक आठवडा आधी त्याचे नाव बदलण्यात आले आहे. मात्र, नाव बदलण्याबाबत यशराज स्टुडिओकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com