Delhi Court Summons Leena Manimekalai: चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांच्या अडचणीत वाढ होत आहे. आता दिल्ली न्यायालयाने लीना मनिमेकलाई यांना समन्स बजावले आहे. त्यांच्या आगामी 'काली' चित्रपटाच्या पोस्टर्स आणि प्रमोशनल व्हिडिओमध्ये हिंदू देवीचे अनुचित चित्रण केल्याबद्दल एका याचिकेवर न्यायालयाने त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना समन्स बजावले आहे.
दरम्यान, न्यायाधीश अभिषेक कुमार यांनी मणिमेकलाई यांना 6 ऑगस्ट रोजी न्यायालयात (Court) हजर राहण्याचे निर्देश दिले. त्यांनी म्हटले की, 'कोणताही आदेश देण्यापूर्वी त्यांची सुनावणी झाली पाहिजे.' लीना मनिमेकलाई (Leena Manimekalai) यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत म्हटले की, 'आगामी काली चित्रपटाच्या पोस्टर आणि प्रोमो व्हिडिओमध्ये हिंदू देवीचे चित्रण अतिशय अयोग्य पद्धतीने केले आहे.'
याचिकेत काय म्हटले होते?
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हिंदू (Hindu) देवी सिगारेट ओढताना दिसत आहे. जे केवळ सामान्य हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावत नाही तर नैतिकता आणि सभ्यतेच्या मुलभूत गोष्टींच्या विरोधात जाते. याचिकेत म्हटले आहे की, 'हे पोस्टर मनिमेकलाई यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन ट्विट केले होते.' राज गौरव यांनी दाखल केलेल्या याचिकेत मणिमेकलाई यांना पोस्टर्स, व्हिडिओ आणि ट्विटमध्ये देवतांचे अनुचित चित्रण करण्यापासून तात्पुरते रोखण्यासाठी अंतरिम आदेशाची मागणी करण्यात आली आहे.
काय आहे काली पोस्टरचा वाद?
विशेष म्हणजे, चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी काली चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला. पोस्टरमध्ये देवी कालीच्या वेशभूषेत एका महिलेचे चित्रण करण्यात आले. फोटोमध्ये ती सिगारेट ओढताना दिसत आहे. देवीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीच्या हातामध्ये LGBTQ चा ध्वजही आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत लीना मनिमेकलाई यांच्या विरोधात भारतभरात अनेक एफआयआर नोंदवण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.