Justin Bieber India Show Instagram
मनोरंजन

Justin Bieber चा दिल्लीतील शो 'या' कारणामुळे रद्द

Justin Bieber India Show: प्रसिद्ध हॉलिवूड गायक जस्टिन बीबरच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

दैनिक गोमन्तक

जगातील प्रसिद्ध पॉप सिंगर जस्टिन बीबर त्याच्या प्रकृतीच्या कारणांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. पण नुकतीच त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते पुन्हा एकदा जगाच्या दौऱ्यावर पुनरागमन करत असल्याची बातमी आली होती. पण आता जस्टिन बीबरच्या (Justin Bieber) चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. तब्येत खराब असल्यामुळे जस्टिन बीबरचा भारतातील शो रद्द करण्यात आला आहे.

वर्ल्ड टूर दरम्यान जस्टिन बीबर पुढील महिन्यात ऑक्टोबरमध्ये भारतात (India) येणार होता. इतकंच नाही तर जस्टिन दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आपला परफॉर्मन्स देणार होता. त्यांच्या मैफलीची तारीख 18 ऑक्टोबर ठेवण्यात आली होती.पण आता 'जस्टिन बीबर जस्टिस वर्ल्ड टूर - इंडिया' नावाचा हा शो रद्द करण्यात आला आहे. शो रद्द करण्यामागे त्यांची प्रकृती खालावल्याचे कारण सांगितले जात आहे.

हा शो 18 ऑक्टोबरला होणार होता

जस्टिन बीबर शो 'बुक माय शो'च्या प्रमोटरने ही माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, ग्रॅमी अवॉर्ड विजेता बीबर 18 ऑक्टोबरला दिल्लीत शो करणार होता.जी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच निराशा झाली आहे. त्याचवेळी, जस्टिनचा इंडिया शो रद्द झाल्याच्या बातमीने त्याचे भारतीय चाहते खूप दुःखी झाले आहेत. कारण त्याच्या पुढच्या महिन्यात होणाऱ्या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत होते.

जस्टिनचा केवळ भारत दौराच रद्द झाला नाही तर अनेक देशांचे दौरेही रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये चिली, अर्जेंटिना, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, बहरीन, यूएई आणि इस्रायल या देशांचा समावेश आहे. बीबरने तीन महिन्यांपूर्वी सांगितले होते की तो 'रॅमसे हंट सिंड्रोम' नावाच्या आजाराशी झुंज देत आहे. ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर अर्धवट लकवा झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rohit Sharma Captaincy: 'मी तयार नव्हतो...' रोहित शर्माने मुलाखतीत सांगितली पडद्यामागची रंजक गोष्ट; काय म्हणाला नेमका?

Delimitation Bill 2026: अटी पूर्ण झाल्यास डिलिमिटेशन बिलाला साथ! ए. राजा यांनी स्पष्ट केली DMK ची भूमिका; चेन्नईतील बैठकीत मोठा निर्णय

Colvale Jail: कोलवाळ कारागृहातील हल्ला प्रकरणात आणखी 4 कैद्यांना अटक; आरोपींची संख्या सातवर

पॉवर, लूक आणि जबरदस्त फीचर्सचा भन्नाट मेळ! Royal Enfield Himalayan 750 बाजारात दाखल; 55 BHP पॉवर, 63 Nm टॉर्क आणि 5 रायडिंग मोड्सने वाढवली रायडर्सची उत्सुकता

Under 19 Cricket: गोव्याच्या गोलंदाजांचा ओडिशाला लगाम; पहिल्या डावातील आघाडीसाठी संघ सज्ज

SCROLL FOR NEXT