Joseph Manu James Dainik Gomantak
मनोरंजन

Joseph Manu James Death: साऊथ इंडस्ट्री शोकाकूल, 31 वर्षीय चित्रपट दिग्दर्शकाचे निधन

Film Director Death: जोसेफ मनू जेम्स केवळ 31 वर्षांचा होता. त्याने अखेरचा श्वास घेतला तेव्हा तो हेपेटायटीसवर उपचार घेत होता.

Manish Jadhav

Joesph Manu James Passes Away before Debut Film Release: साऊथ इंडस्ट्रीतील अभिनेता आणि चित्रपट दिग्दर्शकाचे निधन झाल्याने दक्षिण चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. प्रत्येक दिग्दर्शकाला वाटतं की, तो जो काही चित्रपट बनवतो तो जगाने पाहावा आणि त्याचं काम सगळ्यांना कसं आवडलं हे त्याला जाणून घ्यायचं असतं, पण हा दिग्दर्शक ते करु शकणार नाहीत.

दरम्यान, ज्या दिग्दर्शकाबद्दल आम्ही बोलत आहोत तो केवळ 31 वर्षांचा होता आणि त्याचा पहिला चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. त्याचा हा चित्रपट (Movie) काही दिवसातच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, मात्र त्यापूर्वीच या चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे निधन झाले. चला तर मग जाणून घेऊया या दिग्दर्शकाबद्दल आणि त्याच्या पहिल्या चित्रपटाबद्दल...

या 31 वर्षीय चित्रपट दिग्दर्शकाचे निधन झाले

आम्ही इथे मल्याळम चित्रपट दिग्दर्शक जोसेफ मनू जेम्सबद्दल बोलत आहोत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जोसेफ मनू जेम्स केवळ 31 वर्षांचा होता. त्याने अखेरचा श्वास घेतला तेव्हा तो हेपेटायटीसवर उपचार घेत होता. जोसेफ मनू जेम्स याचे 24 फेब्रुवारी रोजी केरळमधील (Kerala) एर्नाकुलम जिल्ह्यातील अलुवा रुग्णालयात निधन झाले.

डेब्यू फिल्म काही दिवसात रिलीज होणार होती

जोसेफ मनू जेम्सचा पहिला मल्‍याळम चित्रपट, 'नॅन्सी रानी' अजून रिलीज व्हायचा आहे, पण तो लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अहाना कृष्णा आणि अर्जुन अशोकन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जोसेफच्या निधनाने साऊथ इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला असून सर्व स्टार्स त्याच्याप्रती श्रद्धांजली वाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Delhi Goa Flight: विमानात तांत्रिक बिघाड; दिल्लीतून गोव्याला येत असलेले विमान मुंबईला वळवले

पावसाळी अधिवेशनापूर्वी आमदार विजय सरदेसाई अडचणीत; सभापती तवडकरांबाबत जातीय वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिस तक्रार

Israel Syria Attack: दमास्कसमधील 'ड्रोन हल्ला' लाइव्ह! स्फोट होताच टीव्ही अँकरची उडाली भंबेरी, व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: सोनं-चांदी झालं स्वस्त! सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर

POP Ganesh Idol: गोव्यात प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या विक्रीवर कठोर बंदी घाला; हिंदू जनजागृती समितीची मागणी

SCROLL FOR NEXT