South Film Industy : मल्याळम अभिनेत्री सुबी सुरेश यांचे निधन, सेलिब्रिटींच्या सलग होणाऱ्या मृत्यूने साऊथ इंडस्ट्री चिंतेत

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री सुबी सुरेश यांचं निधन झाल्याने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे
Subi Suresh
Subi Suresh Dainik Gomantak
Published on
Updated on

साऊथ फिल्म इंडस्ट्री गेल्या काही दिवसांपासून सलग धक्क्यातून जात आहे. आता एक नवा धक्का इंडस्ट्रीला बसला आहे. एका लोकप्रिय मल्याळम अभिनेत्रीचं नुकतंच निधन झाल्याची बातमी आली आहे. गेल्या काही दिवसांपासून एकामागून एक अनेक सेलेब्सच्या आकस्मिक मृत्यूने सर्वांना धक्का बसत आहे. आता मल्याळम इंडस्ट्रीतील लोकप्रिय कॉमेडियन आणि टीव्ही होस्ट सुबी सुरेश यांचे निधन झाले आहे. 

अलीकडेच, एसके भगवान आणि मायलसामी यांच्याशिवाय, ज्युनियर एनटीआरचा चुलत भाऊ तारक रत्न यांचं निधन झाल्याने इंडस्ट्री शोकात बुडाली होती. या सलग बसलेल्या धक्क्यातून साऊथ फिल्म इंडस्ट्रीही सावरू शकली नव्हती की आता सुबी सुरेशच्या रूपाने आणखी एक जोरदार धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 42 वर्षीय सुबी सुरेश यकृताशी संबंधित आजाराने त्रस्त होत्या आणि त्यांच्यावर कोची येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सुबी सुरेशने आपल्या करिअरची सुरुवात डान्सर म्हणून केली होती. त्यानंतर त्या स्टेज शोमध्ये कॉमेडी करू लागल्या.

'सिनेमाला' या कॉमेडी शोमुळे सुबी सुरेश हे नाव घराघरात प्रसिद्ध झाले. त्या शेवटच्या मुलांच्या कुट्टी पट्टलम शोमध्ये दिसल्या होत्या. सुबी सुरेशचे वडील दुकान चालवतात तर आई गृहिणी आहे. सुबी सुरेशने लग्न केले नाही. पण त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कोणाशीही बोलल्या नाहीत.

'ठकसारा लहाला', 'गृहथन' आणि 'ड्रामा' यांसारख्या चित्रपटांमध्ये सुबी सुरेशचे चांगलेच कौतुक झाले. त्यांच्या विनोदी आवाजाचे लोक कौतुक करत होते. चित्रपटांसोबतच तिने अनेक टीव्ही शो देखील केले आणि त्या होस्ट देखील होत्य़ा.

 सुबी सरेशही तिच्या फिटनेसबद्दल खूप जागरूक होत्या आणि ती अनेकदा त्यांचे वर्कआउट व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत होत्या. लॉकडाऊन दरम्यान सुबी सुरेशच्या वर्कआऊट व्हिडिओंची खूप चर्चा झाली.

Subi Suresh
Aditya Roy Kapoor : "आदित्य रॉय कपूरला जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न" आदित्य म्हणाला ती...

फेब्रुवारी 2023 मध्ये, आत्तापर्यंत साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील 8 सेलिब्रिटींनी या जगाचा निरोप घेतला आहे. यामध्ये वाणी जयराम, तारका रत्न, टीपी गजेंद्रन, के विश्वनाथ, मायलसामी, एसके भगवान, एडिटर श्री जी जी कृष्ण राव आणि आता सुबी सुरेश या कलाकारांचा मृत्यू झाला आहे .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com