Rishabh Shetty On Bollywood: ऋषभ शेट्टीचा बॉलीवुडला नकार; कन्नड फिल्म इंडस्ट्री हीच कर्मभूमी

कन्नड इंडस्ट्रीतच खूष असून चित्रपट मात्र हिंदीत डब करणार असल्याची माहिती
Rishabh Shetty
Rishabh ShettyDainik Gomantak
Published on
Updated on

Rishabh Shetty On Bollywood: अभिनेता ऋषभ शेट्टी सध्या 'कांतारा' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रम नोंदवले आहेत. हा चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील रीलीज झाला आहे.

नुकतेच एका मुलाखतीत ऋषभ शेट्टी याला बॉलीवुडमध्ये काम करण्याबाबत विचारले गेले, त्यावर ऋषभ म्हणाला की, मला कन्नड फिल्म इंडस्ट्रीतच राहायला आवडेल, कारण मी आज ज्या स्थानावर पोहचलो आहे ते केवळ आणि केवळ कन्नड इंडस्ट्रीमुळेच.

Rishabh Shetty
The Kashmir Files: वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी लॅपिड यांच्याविरोधात तक्रार दाखल

ऋषभ म्हणाला की, कन्नड फिल्म इंडस्ट्रीने मला एक अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून विकसित होण्यासाठी व्यासपीठ दिले. आज मी ज्या स्थानी आहे आणि कांतारा चित्रपटाला जे यश मिळाले आहे ते केवळ कन्नड फिल्म इंडस्ट्रीमुळेच. जर माझ्या कन्न्ड चित्रपटांना हिंदी किंवा इतर भाषिक क्षेत्रातील प्रेक्षक पसंत करत असतील तर मी माझ्या चित्रपटांचे हिंदी डबिंग नक्कीच करेन. आज चित्रपटात भाषेचा अडथळा राहिलेला नाही. कन्नड सिनेमा ही माझी कर्मभुमी आहे आणि मी येथे काम करत राहीन.

ऋषभचा कांतारा हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी रीलीज झाला होता. तेव्हापासून आज दोन महिने झाले तरी बॉक्सऑफिसवरील कांताराची जादू कमी झालेली नाही. मूळ कन्नड भाषेतील हा चित्रपट नंतर 14 ऑक्टोबर रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगु भाषेत रीलीज केला गेला. या चित्रपटामुळे ऋषभ शेट्टी रातोरात स्टार झाला आहे. देशभरात या चित्रपटाचे कौतूक झाले आहे.

Rishabh Shetty
IFFI Goa 2022: डियाझना विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान

केजीएफ-2 ला कमाईत टाकले मागे

या चित्रपटाने आत्तापर्यंत जगभरातून 400 कोटीहून अधिक रूपयांची कमाई केली आहे. चित्रपटाचे बजेड केवळ 18 कोटी रूपये आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत केजीएफ-2 या चित्रपटालाही मागे टाकले आहे. या चित्रपटाच्या यशाने चित्रपटपंडितांनाही आश्चर्य वाटत आहे. आयएमडीबीवरदेखील चित्रपटाला दहापैकी नऊ पेक्षा अधिक रेटिंग मिळाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com