World Cup 2023 Dainik Gomantak
मनोरंजन

हे कलाकार वाढवणार वर्ल्ड कपची रंगत... क्रिकेटच्या खेळात खेळाडूंसोबत रंगणार कलाकारही

Rahul sadolikar

World cup Final Match: भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान 19 नोव्हेंबरला क्रिकेट वर्ल्ड कप साठी अंतीम सामना होणार आहे. संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेला हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे.

तब्बल 20 वर्षांनी दोन्ही संघ वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या हायव्होल्टेज सामन्यासाठी कलाकार मंडळीही खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी सहभागी होणार आहेत. कोण असणार हे कलाकार चला पाहुया.

वर्ल्ड कपचा फायनल

संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेला वर्ल्डकप फायनल थोड्याच वेळात सुरु होणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियमध्ये आज दुपारी २ वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा फायनलचा सामना रंगणार आहे.

वर्ल्डकप फायनलमध्ये सुप्रसिद्ध कलाकार त्यांच्या अदाकारीने सामन्याची शान वाढवणार आहेत. पाहा फायनलमध्ये कोणाचे परफॉर्मन्स पाहायला मिळणार.

जोनिता गांधी, प्रितम चक्रवर्ती

सामन्यादरम्यान खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी जोनिता गांधी - ही एक इंडो-कॅनेडियन गायिका सादरीकरण करेल. इनिंग ब्रेक दरम्यान तिचा दमदार परफॉर्मन्स होईल.

प्रीतम चक्रवर्ती- बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आहेत. दोन इनिंगमध्ये असलेल्या विश्रांतीदरम्यान त्यांचं लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहे.

आकासा सिंह- 'खिच मेरी फोटो' फेम गायिका आकासा सिंग रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाइव्ह परफॉर्म करणार आहे. ती 'बिग बॉस 15' मध्येही सहभागी झाली होती.

हे कलाकार वाढवतील खेळाडूंचा उत्साह

अमित मिश्रा - अनेक लोकप्रिय गाण्यांचा आवाज आणि प्रसिद्ध असलेले गायक अमित मिश्रा वर्ल्डकपमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहे.

नकाश अझीझ - संगीतकार ए आर रहमानचे सहाय्यक म्हणून यांची ओळख आहे. 38 वर्षीय गायक नकाश अझीझ वर्ल्ड कप फायनलमध्ये लाईव्ह परफॉर्मन्स करणार आहेत

तुषार जोशी - 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील गाण्यांसाठी तुषार जोशींची ओळख आहे. तुषारच्या गाण्यांची जादू वर्ल्डकप फायनलमध्ये पाहायला मिळणार आहे.

अजिंक्य राहिलेला भारतीय संघ

तब्बल 45 दिवसांपासून सुरू असलेला क्रिकेट विश्वचषकाचा रणसंग्राम अखेरच्या टप्प्यात पोचला असून 10 पैकी 10 सामन्यांत विजय मिळविणारा भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम युद्ध जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.

आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. या सामना पाहण्यासाठी रजनीकांत, शाहरुख, सलमानपासुन अनेक लोकप्रिय कलाकार उपस्थित राहण्याची शक्यता आहे

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT