जॉन अब्राहम त्याच्या आगामी चित्रपटांमुळे खूप चर्चेत आहे. नुकताच त्याचा 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला असुन ज्यामध्ये त्याची स्टाइल आणि लूक सर्वांनाच आवडला होता. याशिवाय त्याने त्याच्या आगामी 'पठाण' या चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण केले आहे. आता अभिनेत्याने त्याच्या आगामी 'तेहरान' (Tehran) या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे. जॉनने आजपासून म्हणजेच 11 जुलैपासून दिनेश विजानच्या या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. यासोबतच त्याने या चित्रपटातील त्याचा लूकही शेअर केला आहे. (Tehran First Look Teaser Out News)
* तेहरानचे शूटिंग सुरू
जॉन अब्राहमने त्याच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून त्याचा आगामी चित्रपट 'तेहरान'चा टीझर पोस्टर शेअर केला आहे. या पोस्टरमध्ये त्याचा दमदार आणि जबरदस्त लूक पाहायला मिळत आहे. पोस्टर शेअर करत जॉनने लिहिले की, 'प्रजासत्ताक दिन 2023 साठी तयार व्हा. माझा पुढचा चित्रपट 'तेहरान' हा अरुण गोपालन दिग्दर्शित करणार आहे. त्याचा हा चित्रपट अॅक्शन थ्रिलरसह एका सत्य घटनेवर आधारित असेल.
या चित्रपटाचे दिग्दर्शन अरुण गोपालन करणार आहेत. त्याचबरोबर 'बदलापूर', 'स्त्री' आणि 'मिमी' यासारखे हिट चित्रपट (Movie) देणारा दिनेश विजन या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात अभिनेत्री कोण असणार याचा सस्पेन्स अजून उलगडलेला नाही.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जॉन अब्राहम 2022 मध्ये रिलीज झालेल्या 'अटॅक' चित्रपटात दिसला होता. त्याचबरोबर 'पठाण', 'एक व्हिलन रिटर्न' आणि 'तेहरान' हे त्याचे आगामी चित्रपट आहेत. जॉन बहुतेक अॅक्शन चित्रपटांची निवड करतो. आता 'तेहरान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात कितपत यशस्वी होतो हे पाहावे लागेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.