Jogira Sara Ra Ra Review Dainik Gomantak
मनोरंजन

Jogira Sara Ra Ra Review : नवाजची जुगाडू वेडींग प्लॅनरची भूमीका कशी होती...चला पाहुया जोगीरा सारा रा रा चा रिव्यू

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'जोगीरा सारा रा रा' नेमका कसा चित्रपट आहे..चला पाहुया या चित्रपटाचा रिव्यू

Rahul sadolikar

हा शुक्रवार इतर दिवसांपेक्षा वेगळा आहे. आजच्या दिवशी भारतात एकुण 35 चित्रपट रिलीज झाले आहेत. यात हिंदीत रिलीज झालेला नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत 'जोगीरा सारा रा रा' हाही एक चित्रपटही आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा आज रिलीज झालेला 'जोगीरा सारा रा रा' हा चित्रपट नेमका कसा आहे? चला पाहुया या 'मुव्ही रिव्यू' मधुन.

चित्रपट जोगिरा सारा रा रा लखनौमध्ये राहणाऱ्या जोगी (नवाजुद्दीन सिद्दीकी)ची गोष्ट आहे, जो खूप मोठा जुगाडू वेडिंग प्लॅनर आहे. लोकांना एकत्र आणण्याचा जुगाड त्याच्याकडे आहे असा त्याचा विश्वास आहे. लग्न जोडण्याचा खरा इलाजही त्याच्याकडे नसला तरी तरी त्याला स्वत:विषयी खात्री वाटते ! खरं तर, तो त्याच्या आई आणि अनेक बहिणींसोबत राहतो. 

जोगी आणि त्याचं काम

मोठ्या कुटुंबामुळे व्यथित झालेल्या जोगीला लग्नानंतर दुसऱ्या स्त्रीचा प्रवेश नको आहे. एके दिवशी जोगीला डिंपल (नेहा शर्मा) भेटते, जी त्याच्यासारखीच लग्नापासून पळून जाते. पण ती लल्लूशी (मिमोह चक्रवर्ती) लग्न करणार आहे. अशा स्थितीत डिंपल जोगीला तिचे लग्न मोडण्याविषयी मदत मागते आणि जोगीही त्याला होकार देतो. 

डिंपलचे लग्न मोडण्यासाठी गोष्ट अशी वळण घेते की जोगी आणि डिंपलच्या कुटुंबीयांनी दोघांनाही लग्नाच्या बंधनात बांधायचे ठरवले होते. अशा परिस्थितीत डिंपल आणि जोगीची जोडी काय करते? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमागृहात जावे लागेल.

दिग्दर्शक दुसऱ्यांदा नवाजसोबत

मे-जून या सुट्ट्यांच्या महिन्यांत मोठे चित्रपट प्रदर्शित न झाल्यामुळे, अनेक निर्माते त्यांचे चित्रपट प्रदर्शित करत आहेत, जे बऱ्याच काळापासून प्रदर्शनाच्या तारखेची वाट पाहत आहेत. जोगिरा सारा रा रा हा चित्रपटही असाच एक चित्रपट आहे. 'बाबू मोशाय बंदूकबाज'नंतर चित्रपटाचे दिग्दर्शक कुशान नंदी यांनी नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत पुन्हा एकदा काम केले आहे. 

त्याच्या आधीच्या चित्रपटालाही विशेष प्रेक्षक मिळालेला नाही. त्याचबरोबर हा चित्रपट मर्यादित पडद्यावरही प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट यापूर्वी १२ मे रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु द केरळ स्टोरीच्या बंपर कामगिरीमुळे तो दोन आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आला.

चित्रपट कमी कुठे पडला?

चित्रपटाचे दिग्दर्शक कुशान नंदी यांनी लेखक गालिब असद भोपाली यांच्या कथेवर आधारित कौटुंबिक मनोरंजन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. सुरुवातीला येणारी गाणी मध्यंतराच्या आधी सोडली तर चित्रपटही प्रेक्षकांच्या भरभरून मनोरंजनाची आशा निर्माण करतो. पण मध्यंतरानंतर, पटकथेत ताकद नसल्यामुळे कथा रुळावरून घसरते आणि कमकुवत क्लायमॅक्समुळे उरलेल्या आशाही नष्ट होतात असं म्हणावं लागेल. 

पटकथा ट्रॅक सोडते त्यामुळेच...

कदाचित कुशनने चित्रपटाच्या उत्तरार्धात थोडे अधिक काम केले असते तर जोगिरा सारा रा रा एक चांगला चित्रपट बनवू शकला असता. कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचं तर, नवाजुद्दीनने आपल्या नेहमीच्या शैलीत प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. पण दिग्दर्शकाने नवाजला डान्स करण्यापासून परावृत्त केले असते तर बरे झाले असते. 

दुसरीकडे, नेहा शर्माला मुख्य नायिकेच्या संधीचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. मिमोह चक्रवर्ती आश्चर्यकारकपणे प्रेक्षकांना हसवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करत असला तरी तो फारसा यशस्वी झाला नाही. दुसरीकडे, संजय मिश्रांनी नेहमीप्रमाणेच अप्रतिम अभिनय केला आहे. चित्रपटातील बाकी कलाकारांनीही उत्तम अभिनय केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: रोहित शर्मा बनला टी20 वर्ल्ड कप 2026 चा 'ब्रँड ॲम्बेसेडर'; जय शहांची मोठी घोषणा!

Navpancham Yog 2025: डिसेंबर महिन्यात 'या' 3 राशींच्या लोकांचे होणार बल्ले-बल्ले, नवपंचम योग ठरणार वरदान; धनलाभासह करिअरमध्ये सकारात्मक बदलाची चिन्हे!

Goa Politics: 'नोकरी घोटाळ्यातील एजंट भाजपचे', विजय सरदेसाईंचा मोठा गौप्यस्फोट; ढवळीकरांविरोधात षड्यंत्राचा आरोप

IND vs SA 2nd Test: केएल राहुलला टर्न समजलाच नाही, सायमन हार्मरच्या 'अविश्वसनीय' चेंडूवर त्रिफळाचीत! तुम्ही VIDEO पाहिला का?

Smriti Mandhana: 'तिला' स्विमिंगसाठी विचारलं! पलाश मुच्छलचे भलत्याच मुलीसोबत चॅट्स व्हायरल; क्रिकेटर स्मृतीला मोठा धक्का?

SCROLL FOR NEXT