Raghava Lawrence Dainik Gomantak
मनोरंजन

Jigarthanda DoubleX Teaser: 'जिगरथंडा डबल एक्सचा' हा दमदार टिझर पाहिलात का ?

सुपरस्टार राघव लॉरेन्स आणि जे. एस सुर्या स्टारर जिगरथंडा डबल एक्सचा टिझर रिलीज

गोमन्तक डिजिटल टीम

राघव लॉरेन्स आणि जे.एस. सुर्या यांची मुख्य भुमीका असलेला जिगरथंडा डबल एक्सचा एक दमदार टीझर नुकताच रिलीज झाला असुन प्रेक्षकांच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. विशेष म्हणजे तीन मिनीटांच्या या टिझरमध्ये एकही डायलॉग नाही. असं असलं तरी फिल्मचा सुंदर कॅमेरा सगळं काही सांगुन जातो. राघव लॉरेन्स आणि जे.एस. सुर्या यांचा दमदार अभिनय आपल्याला या टिझरमध्ये बघायला मिळणार आहे त्यावरुनच चित्रपटाच्या कथेची कल्पना येवू शकते.

'कार्तिक सुब्बाराव' दिग्दर्शीत या चित्रपटाचे शुटींग अलीकडेच मदुराई येथे सुरु होते. हाय अॅक्शन एन्टरटेनमेंट असलेल्या या चित्रपटात राघव लॉरेन्स (Raghava Lawrence) आणि जे.एस. सुर्या (J. s .suryah) यांचा दमदार अभिनय बघायला मिळणार आहे.

2014 साली रिलीज झालेल्या 'जिगरथंडा' या चित्रपटाचाच हा सिक्वल असणार आहे. जिगरथंडा या चित्रपटाला प्रेक्षक आणि क्रिटीक्सकडुन चांगलाच प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे साहजिकच बॉक्स ऑफिसवर या फिल्मने चांगली कमाई केली होती.

चित्रपटाचा निर्माता कार्तिकेयन संथानम म्हणतो की, हा चित्रपट आमच्यासाठी एक ड्रिम प्रोजेक्ट आहे. जिगरथंडाला केवळ क्रिटीक्सकडुनच कौतुक मिळालं नाही तर तमिळ चित्रपटाचा एक आवाज म्हणुन दिग्दर्शकाला नावाजले गेले.

हा चित्रपट हिंदी, तमीळ आणि तेलगु भाषेतुन प्रदर्शित होईल. प्रेक्षकांनाही या चित्रपटाची उत्सुकता असेल हे नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT