Neha Pendse Dainik Gomantak
मनोरंजन

Neha Pendse: अभिनेत्रीच्या घरी लाखोंची चोरी, पोलिसांनी नोकराला घेतले ताब्यात

Neha Pendse: नेहा पेंडसेचा पती शार्दुल याच्या घरातून सोन्याचे ब्रेसलेट आणि हिऱ्याची अंगठी चोरीला गेली.

गोमन्तक डिजिटल टीम

Neha Pendse: 'भाभीजी घर पे है फेम' अनिता भाभीची भूमिका साकारणाऱ्या नेहा पेंडसेच्या घरातून लाखो रुपयांची चोरी झाली आहे. अभिनेत्रीच्या घरातून नोकराने 6 लाख रुपयांचे दागिने चोरून पळ काढला. त्यानंतर नोकराच्या विरोधात एफआयआर दाखल केली असून पोलिसांनी नोकराला अटक केली आहे.

नेहा पेंडसेचा पती शार्दुलसोबत अरिटो बिल्डिंग,मुंबईत राहते. शार्दुलच्या ड्रायव्हरने नोकराच्या विरोधात एफआयआर दाखल करून 28 डिसेंबर रोजी चोरी झाल्याचे सांगितले. नेहा पेंडसेचा पती शार्दुल याच्या घरातून सोन्याचे ब्रेसलेट आणि हिऱ्याची अंगठी चोरीला गेली. नेहाने या दोन्ही गोष्टी पती शार्दुलला गिफ्ट केल्या होत्या.

ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार, नोकराचे नाव सुमित कुमार सोलंकी असून त्याची नजर दागिन्यांवर पडताच त्याने ते चोरले. नेहा पेंडसेच्या घरी सुमितकुमार सोलंकी याच लोकांसोबत राहत होता. चालकाने सांगितले की, शार्दुलला चोरीचा संशय आल्यावर त्याने घरातील सर्व नोकरांना बोलावून चौकशी केली. पण सोलंकी तेव्हा कुलाब्यात होते. त्यांना फोन करून याबाबत विचारणा केली असताही त्यांनी टाळाटाळ केली.

शार्दुल आणि नेहा पेंडसे यांनी नोकर सुमितकुमार सोलंकी याच्यावर संशय घेतला आणि त्याच्याविरुद्ध पोलिसात एफआयआर दाखल केला. पोलिसांनी नोकराला अटक केली, मात्र चोरीचे दागिने अजूनही सापडलेले नाहीत.

नेहा पेंडसेच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे तर, तिने मे आय कम इन मॅडम, बिग बॉस सहअनेक टीव्ही शो केले आहेत, परंतु तिला लोकप्रियता 'भाबीजी घर पर हैं!' कडून मिळाल्याचे म्हटले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT