Atlee upcoming movie with shahrukh khan Dainik Gomantak
मनोरंजन

जवानचा दिग्दर्शक शाहरुख आणि विजयसोबत करणार पुढचा चित्रपट...

Rahul sadolikar

Atlee upcoming movie with shahrukh khan : साऊथचा सुपरस्टार दिग्दर्शक अॅटलीने देशभरात आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. नुकताच तो सलमान खानची बहिण अर्पिता खानच्या दिवाळी पार्टीत दिसला होता. तेथे तो पत्नीसोबत दिसला. मात्र, शाहरुख खान स्टारर चित्रपट केल्यापासून तो सातत्याने चर्चेत आहे. 

आता आणखी एक माहिती समोर येत आहे. असे सांगितले जात आहे की अॅटली आणखी एक चित्रपट करणार आहे ज्यामध्ये किंग खान नक्कीच असेल. तसेच, थलपथी विजय त्यांच्यासोबत या प्रोजेक्टमध्ये सामील होईल.

जवानचे यश

'जवान' हा मल्टीस्टारर चित्रपट 7 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर 1100 कोटींहून अधिक कमाई केली. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी लोकांना अपेक्षा होती की थलपथी विजय देखील यात दिसणार आहे. पण असे झाले नाही. पण आता अॅटलीने शाहरुख आणि विजय हे दोघेही त्याच्या आगामी चित्रपटात असतील याची पुष्टी केली आहे.

यूट्यूबर गोपीनाथ

तमिळ टीव्ही प्रेझेंटर आणि यूट्यूबर गोपीनाथ यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान, ऍटलीने सांगितले की त्यांनी विजयला फोन केला होता आणि 21 सप्टेंबर 2023 रोजी त्याच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी आमंत्रित केले होते. तो नक्कीच येईन असे विजयने सांगितले होते. 

विजय पार्टीला आला तेव्हा शाहरुख आणि विजय यांच्यात बोलणे झाले आणि त्याने अॅटलीला फोन केला. शाहरुखने दिग्दर्शकाला सांगितले की, जर तो दोन नायकांना घेऊन चित्रपट बनवण्याचा विचार करत असेल तर दोघेही तयार आहेत.

पुढचा चित्रपट

यावेळी विजय तेथे उपस्थित होता. त्यानेही होकार दिला आणि .' ऍटली म्हणाला, 'म्हणूनच मी अशा प्रकारच्या चित्रपटात काम करत आहे. हा माझा पुढचा चित्रपट असू शकतो. चांगल्या स्क्रिप्टसह पुनरागमन करण्यासाठी मी खूप मेहनत घेत आहे. बघू काय होते ते.' 

थेरी

अॅटलीने 2016 मध्ये विजयसोबत थेरी हा चित्रपट बनवला होता, जो खूप गाजला होता. यानंतर त्याने 2017 मध्ये मेसरल आणि 2017 मध्ये बिगिल बनवले. दोघांमध्ये विजय होता आणि बॉक्स ऑफिसवर त्यांची कामगिरी चांगली होती.

खून प्रकरणातील आरोपीला भावाच्या लग्नासाठी सात दिवसांसाठी जामीन, रुमडामळमध्ये तणाव शक्य

Bicholim: पोलिस बंदोबस्तात पिराचीकोंड येथील बेकायदा झोपडपट्टी जमीनदोस्त, परिसरात तणाव

Goa Today's News Live: खांडेपार येथील गटारात पडून गाय जखमी

दक्षिण गोव्यात Swiggy डिलिव्हरी बाईज् संपावर, काय आहेत प्रमुख मागण्या?

Goa Congress: दरमहा सात हजार! पगार की शिक्षा? शिक्षकांना देण्यासाठी भाजप सरकारकडे नाहीत पैसे; काँग्रेस

SCROLL FOR NEXT