Javed Akhtar  Dainik Gomantak
मनोरंजन

जावेद अख्तर बनले Fake news चे शिकार , लखनौ पोलिसांची बनावट प्रेस रिलीज केली शेअर

Uttar Pradesh News: लखनौमधील लुलू मॉल उद्घाटन झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

दैनिक गोमन्तक

Javed Akhtar: लखनौमधील लुलू मॉल उद्घाटन झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यातच आता प्रसिध्द गीतकार जावेद अख्तरही या वादाच्या भोवऱ्यात आले आहेत. त्यांनी लखनौ पोलीस आयुक्तालयाची बनावट प्रेस रिलीज आपल्या ट्विटर हॅंडलवर शेअर केली आहे. नमाज अदा केल्यानंतर पोलिसांनी चार मुस्लिमांना अटक केली होती. त्यानंतर त्यांची सुटकाही केली. जावेद अख्तर यांनी शेअर केलेल्या प्रेस रिलीजमध्ये चारपैकी तीन नावे सरोज, कृष्णा आणि गौरव हिंदू आहेत.

दरम्यान, जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्या ट्विटर हँडलवर बनावट रिलीज पाहून लोक चांगलेच संतापले. प्रभात उपाध्याय या यूजर्सने लिहिले की, 'जावेद अख्तर जी, आरोपींची योग्य नावे पुढीलप्रमाणे आहेत. मोहम्मद रेहान, आतिफ खान, मुहम्मद लोकमान आणि मोहम्मद नोमान. तुम्ही तथ्यांची तपासणी केली नाही.' जावेद अख्तर यांना टॅग करत, पोलिसांची (Police) मूळ प्रेस रिलीजही उपाध्याय यांनी सोशल मीडियावर शेअर केली.

दुसरीकडे, एम श्रीवास्तव नावाच्या युजरने लिहिले की, 'कृपया त्यांना योग्य माहिती द्या. दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवल्या जात आहेत.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT