Javed Akhtar Dainik Gomantak
मनोरंजन

Netaji Subhas Chandra Bose Statue: नेताजींच्या पुतळ्यावरुन जावेद अख्तर होतायेत ट्रोल

नेताजींचा पुतळा बसवण्याची कल्पना चांगली असली तरी जागेची निवड योग्य नाही, असे मत जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी मांडले आहे.

दैनिक गोमन्तक

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी रविवारी इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले. तिथे नेताजींचा ग्रॅनाइटचा पुतळा बसवण्यात येणार आहे. हा पुतळा प्रसिद्ध शिल्पकार अद्वैत गडनायक (Advaita Gadnayak) यांनी बांधला आहे. याची देशभर चर्चा सुरु आहे. याच पाश्वभूमीवर आता गीतकार जावेद अख्तर यांनी या प्रकरणी आपली बाजू मांडली आहे. नेताजींचा पुतळा बसवण्याची कल्पना चांगली असली तरी जागेची निवड योग्य नाही, असे मत जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी मांडले आहे. त्यांच्या या ट्विटनंतर जावेद अख्तर ट्रोल होत आहेत. (Javed Akhtar Is Being Trolled From The Statue Of Netaji Subhash Chandra Bose)

जावेद अख्तर यांनी काय लिहिले

जावेद यांनी ट्वीटमध्ये म्हटले, 'नेताजींच्या पुतळ्याची कल्पना चांगली आहे, परंतु पुतळ्याबाबतची निवड योग्य नाही. या पुतळ्याभोवती दिवसभर वाहतूक सुरु राहणार आणि पुतळ्याची पोझ वंदन करणारी असेल. हे त्यांच्या प्रतिष्ठेसाठी चांगले नाही.'

दरम्यान, जावेद अख्तर यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, 'तुम्हाला फक्त मोदीजींवर टीका करायची आहे... कारण काहीही असो.' एकाने लिहिले – 'जावेद साहब, एकदा तुम्ही असेही म्हणा की दिवसातून पाच वेळा नमाज अदा करण्याची कल्पना चांगली आहे, पण लाऊडस्पीकरवर नमाज पठण करण्याची कल्पना खूपच वाईट आहे. तुमचे ज्ञान तुमच्याकडे ठेवा.'

एका यूजरने लिहिले - तो पुतळा तुम्हाला सलाम करत नाही. तो भारत मातेला वंदन करतो. लोक सम्राटाला रथातून नमस्कार करत होते, पण गाढवांना वाटले की लोक त्यांना नमस्कार करत आहेत. त्याचबरोबर एका यूजरने लिहिले आहे की, तुम्ही तुमच्या छंदाबद्दल बोलणार नाही, पण बाकीच्या लोकांचे काय?

नेताजींच्या या पुतळ्यामुळे लोकशाही संस्था, पिढ्या आणि कर्तव्याची जाणीव होईल

नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose) यांच्या या पुतळ्याची परिमाणे 28 फूट बाय 6 फूट असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी इंडिया गेटवर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण केले. या कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, नेताजींचा हा पुतळा आपल्या लोकशाही संस्थेला, आपल्या पिढ्यांना कर्तव्याची जाणीव करुन देईल. येणाऱ्या आणि आताच्या पिढीला प्रेरणा देत राहील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT