Jawed Akhtar: चित्रपटसृष्टीला एक वेगळे स्थान निर्माण करुन देण्यात जावेद अख्तर यांचे योगदान मोठे आहे.चित्रपटांसाठी संवाद लिहिण्यापासून ते बॉलीवूडला अजरामर गाणी देण्यापर्यत जावेद अख्तर यांचा हातभार आहे. आज जावेद अख्तर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या करिअरचा प्रवास कसा घडला हे जाणुन घेऊयात.
आज जावेद अख्तर यांचा 78 वा वाढदिवस आहे.त्यांचा जन्म 17 जानेवारी 1985 रोजी ग्वाल्हेरमध्ये झाला. त्यांचे वडील जन्नीसार अख्तर आणि आजोबा मुज्तार खैराबादी हेही प्रसिद्ध कवी होते. इतकेच नाही जावेद यांची आई सफिया अख्तर याही प्रसिद्ध लेखिका होत्या. घराचा पाठिंबा आणि प्रसिद्धी पाठीशी असतानासुद्धा करिअरची सुरुवात करताना मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
जावेद अख्तर यांनी 1964 मध्ये शिक्षणानंतर मुंबई( Mumbai) गाठली. मुंबईत आल्यानंतर सुरुवातीला राहायला जागा मिळवण्यासाठी त्यांना संघर्ष करवा लागला. सुरुवातीच्या काळात कमाल अमरोहीस्टुडीओमध्ये राहण्याची व्यवस्था केली आणि नोकरीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी संवादलेखनाला सुरुवात केली. महिन्याला 100 रुपए घेऊन त्यांनी संवादलेखनाला सुरुवात केली. 1969 साली त्यांना मोठी संधी मिळाली. सलीम खान यांच्याबरोबर जवळपास 24 चित्रपटांसाठी संवाद लिहले.
जावेद अख्तर आणि सलीम खान( Salim Khan ) यांची जोडी त्याकाळी लोकप्रिय झाली होती. मात्र, त्यानंतर काही मतभेदांमुळे या जोडीत फुट पडली. त्यानंतर जावेद अख्तर यांनी गीतकार म्हणून आपला प्रवास सुरु केला. 'लगान', 'वीर-जारा', 'कल हो ना हो' या सुपरहिट चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली. आज संपुर्ण जग जावेद अख्तर यांना बॉलीवुडचे दिग्गज गीतकार म्हणून ओळखते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.