Jailer Kaavaalaa Song Dainik Gomantak
मनोरंजन

Jailer Kaavaalaa Song: तमन्नाच्या गाण्याने लावले जपानी राजदूताला वेड...व्हिडीओ एकदा पाहाच

रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटातील तमन्ना भाटियाच्या कावला गाण्याने आता जपानच्या राजदूतालाही वेड लागले आहे, या गाण्यावर ताल धरत त्यांनी हा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर केला आहे.

Rahul sadolikar

Jailer Box Office Collection day 8: जॅकी श्रॉफ, मोहनलाल, तमन्ना भाटिया आणि रम्या कृष्णन अभिनीत आणि थलैवा म्हणजेच अभिनेता रजनीकांत यांची मुख्य भूमीका असणारा जेलर सध्या कमाईची घोडदौड करताना दिसत आहे. आता चित्रपटाने ₹300 कोटींचा टप्पा ओलांडण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

चित्रपटाची कमाई

थिएटरमध्ये एका आठवड्यानंतर, बुधवारी रजनीकांतच्या चित्रपटाची गती मंदावली पण तरीही चित्रपटाने चांगली आकडेवारी नोंदवली.

Sacnilk.com ने नोंदवलेल्या सुरुवातीच्या अंदाजानुसार जेलरने 7 व्या दिवशी ₹ 15 कोटी जमा केले . ती आता एकूण ₹ 225.65 कोटी इतकी आहे

जेलरचे तुफान कलेक्शन

जेलर गेल्या गुरुवारी ₹ 48 कोटींमध्ये उघडले होते . शुक्रवार आणि शनिवारी ते थोडे कमी झाले परंतु रविवारी पुन्हा वाढून ₹ 42 कोटी झाले.

सोमवारी ते ₹ 23.55 कोटींवर घसरले आणि स्वातंत्र्यदिनी पुन्हा ₹ 36.5 कोटी वाढले. बुधवारी त्याचे सर्वात कमी कलेक्शन ₹ 15 कोटी होते. या वर्षीच्या इतर मोठ्या रिलीझ, पोनियिन सेल्वन II च्या कलेक्शनलाही जेलरने मागे टाकले आहे.

तमन्नाचा हिट डान्स नंबर

नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित, जेलरमध्ये रजनीकांत जेलर मुथुवेल पांडियन यांच्या मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट अॅक्शन-पॅक एंटरटेनर असल्याचे मानले जाते.

चित्रपटात प्रियंका मोहन, शिवा राजकुमार, जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, योगी बाबू, वसंत रवी, विनायकन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. जेलरमध्ये अभिनेता मोहनलालचा कॅमिओ आहे. या चित्रपटातला तमन्ना भाटियाचा कावला हा डान्स नंबर आधीच हिट झाला आहे.

जपानच्या राजदूतालाही गाण्याचे वेड

कावलाच्या क्रेझने जपानचे भारतातील राजदूत हिरोशी सुझुकी यांनाही वेड लावलं आहे , सुझुकी यांनी जपानी YouTuber मेयो सॅन सोबत एक व्हिडिओ तयार केला आहे ज्यामध्ये ते गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत.

X (पूर्वीचे ट्विटर) वर , त्यांनी लिहिले, “जपानी यूट्यूबर मेयो सॅन (@MayoLoveIndia) सोबत कावाला डान्स व्हिडिओ रजनीकांतवर आमचं प्रेम आहे … @Rajinikanth #Jailer #rajinifans..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT