jacqueline fernandez Dainik Gomantak
मनोरंजन

जॅकलिनची करोडोंची संपत्ती गुल! 9 लाखांच्या मांजरी तर 52 लाखांचा 'घोडा'

चंद्रशेखर जॅकलिनवर पाण्यासारखा पैसा खर्च करत होता.

दैनिक गोमन्तक

अंमलबजावणी संचालनालयाने ईडी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची (jacqueline fernandez) 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली तर जॅकलिनवर 200 कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरकडून अनमोल गिफ्ट घेतल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. चंद्रशेखर जॅकलिनवर पाण्यासारखा पैसा खर्च करत होता. सुकेशने जॅकलीनला (Sukesh Chandrashekhar) कोणते महागडे गिफ्ट दिले हे आता जगा समोर आले आहे. 9-9 लाख रुपये किमतीची मांजरी, 52 लाखाचा घोडा, हिऱ्यांचे दागिने आदींचा त्यात समावेश आहे. (jacqueline fernandez allegedly property seized including 9 lakh cat 52 lakh horse)

सुकेशच्या प्रकरणी ईडीने गेल्या वर्षी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, ज्यात जॅकलिनला दिलेल्या महागड्या भेटवस्तूंचाही उल्लेख करण्यात आला होता. सुकेशने चौकशीदरम्यान जॅकलिनला गिफ्ट दिल्याची कबुली देखील दिली होती. सुकेशने जॅकलिनला 5 कोटी 71 लाख रुपयांच्या भेटवस्तू दिल्याचा ईडीने अंदाज वर्तवला आहे. याशिवाय जॅकलीनच्या नातेवाईकांना 173,000 अमेरिकन डॉलर आणि 27 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्स कर्ज म्हणून देखील देण्यात आले होते. आता एचटीने जॅकलीनला सुकेशकडून मिळालेल्या भेटवस्तूंची यादी मीडियासमोर आणली आहे.

3 पर्शियन मांजरी, त्यापैकी प्रत्येकाची किंमत सुमारे 9 लाख रुपये,

एक अरबी घोडा, ज्याची किंमत 52 लाख रुपये,

डायमंड सेट, कानातल्या अंगठ्याच्या 15 जोड्या

मौल्यवान क्रॉकरी

महागड्या ब्रँडच्या गुच्ची आणि चॅनेल डिझायनर बॅग

दोन गुच्ची पोशाख जिममध्ये घालण्यासाठी

लुई व्हिटॉन शूजच्या अनेक जोड्या

दोन हर्मीस ब्रेसलेट

एक मिनी कूपर कॅरेट

महाग रोलेक्स घड्याळे

सुकेश चंद्रशेखर यांनी गेल्या वर्षी ईडीला दिलेल्या निवेदनात दावा केला होता की, आपण जॅकलिनला 7 कोटी रुपयांचे दागिने भेट म्हणून दिले आहेत. त्याने अमेरिकेत राहणाऱ्या जॅकलिनच्या बहिणीला 1.5 लाख डॉलर (सुमारे 1.13 कोटी रुपयांचे) कर्जही दिले आहे. तिला BMW X5 कारही देण्यात आली होती. सुकेशने जॅकलिनच्या आई-वडिलांना मासेराटी कार आणि बहरीनहून तिच्या आईला पोर्श कार भेट दिल्याचा आरोप देखील केला आहे.

यानंतर ईडीने गेल्या वर्षी ऑगस्ट आणि ऑक्टोबरमध्ये जॅकलिनचे जबाब नोंदवले आहेत. यामध्ये त्यांनी सुकेशकडून भेटवस्तू आणि कर्ज घेण्याचे मान्य ही केले होते. त्यादरम्यान जॅकलीनने सांगितले की तिने गुच्ची आणि सुकेशच्या चॅनेलच्या तीन डिझायनर बॅग, दोन गुच्ची जिम आउटफिट्स, लुई व्हिटनच्या शूजची एक जोडी, डायमंड कॉइलच्या दोन जोड्या, बहु-रंगीत दगडांनी बनवलेले एक ब्रेसलेट आणि हमीजचे दोन ब्रेसलेट यांचा देखील समावेश आहे.

अभिनेत्रीने ईडीला असेही सांगितले होते की सुकेशने तिला मिनी कूपर कार देखील भेट दिली, परंतु त्यांनी ती परत केली होती. सुकेशने तिची बहीण गेराल्डिन हिला कर्ज म्हणून दीड लाख डॉलर्स दिल्याचेही जॅकलिनने सांगितले होते. याशिवाय ऑस्ट्रेलियात राहणारा त्याचा भाऊ वॉरनच्या खात्यात 15 लाख रुपये ट्रान्सफर करण्याचेही मान्य करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI 2025 चा दिमाखदार समारोप! रजनीकांत, रणवीरच्या उपस्थितीने लावले चार चांद, ‘स्किन ऑफ युथ’ला गोल्डन पिकॉक तर संतोष दवखर यांना 'गोंधळ'साठी 'रौप्य मयूर'

Goa Firing: सत्तरीतील पडोसे गावात पुन्हा गोळीबार! एकाला अटक, एअरगन आणि काडतुसे जप्त; वाळपई पोलिसांकडून पुढील तपास सुरु

PM Modi Goa Speech: "आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गोव्याच्या भूमीने मला दिशा दिली", PM मोदी असं का म्हणाले? Watch Video

Goa Accident: मुळगावात दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू; अपघाताची पोलिसांकडून चौकशी सुरु

''गोव्याने केवळ संस्कृतीच जपली नाहीतर...'', गोकर्ण पर्तगाळी मठाच्या योगदानाचे कौतुक करताना PM मोदींनी काढले गौरोद्गार VIDEO

SCROLL FOR NEXT