Jackie Shroff - ayesha shroff  Dainik Gomantak
मनोरंजन

Jackie Shroff : जॅकी श्रॉफच्या पत्नीची फसवणूक; 58लाख...वाचा नेमकं प्रकरण काय?

Jackie Shroff : 2015 मध्ये आयशाने अॅक्टर साहील खानच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता.

गोमन्तक डिजिटल टीम

Jackie Shroff : बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांची पत्नी आयशा श्रॉफसोबत फ्रॉड झाल्याची माहीती समोर आली आहे. आयशा श्रॉफ यांना 58 लाख रुपयांना फसवले गेले आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, एलन फर्नांडिस नावाच्या व्यक्तीने हा फ्रॉड केला आहे.

याबाबत सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपीविरोधात आयपीसी कलम 420, 408, 465, 467, आणि 468 अंतर्गत गुन्हा दाखल गेला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

मिळालेल्या माहीतीनुसार, आयशा श्रॉफ आणि टायगर श्रॉफ चालवत असलेल्या एमएमए मैट्रिक्स जिममध्ये 2018 मध्ये एलन फर्नांडिस यांना डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्सची जबाबदारी देण्यात आली होती.

एलन फर्नांडिसने भारतात आणि भारताबाहेर 11 टूर्नामेंट चा प्लॅन बनवला होता. या आयोजनासाठी त्यांनी कंपनाकडून मोठी रक्कम उचलली होती. टूर्नामेंटसाठी कंपनीच्या अकाऊंटममध्ये डिसेंबर 2018 पासून जानेवारी 2023 पर्यत 58 ,53, 591 रुपए जमा केले आहेत.

याआधीदेखील आयशाची झाली आहे फसवणूक

2015 मध्ये आयशाने अॅक्टर साहील खानच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. 4 करोड रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. मात्र त्यानंतर परस्पर सांमजस्याने हे प्रकरण संपवले आहेत. मात्र अद्याप आयशा यांनी कोणतेही ऑफीशिअल स्टेटमेंट दिले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Beef Trafficing: केरी चेकपोस्टवर 2000 किलो गोमांस जप्त! 2 दिवसांतील तिसरी घटना; पुन्हा तेच वाहन पकडले Video

Goa Politics: खरी कुजबुज; सिनेप्रेम ठीक आहे हो, परंतु पार्किंगचे काय?

Mungul Crime: मुंगुलप्रकरणी नवी अपडेट! हल्ल्यानंतर गँगस्टर वेलीने घेतली 60 लाखांची कार; काणकोणमधील एकजण पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: 'भाजपला पराभूत करण्‍यासाठी गोवा फॉरवर्ड आणि आरजीपीला सोबत घेऊन लढू', पाटकरांनी केले युतीचे सूतोवाच

Candolim: मद्यधुंद पर्यटकांचा गोव्यात धुडगूस! कांदोळी बीचवर 10 दुचाक्यांची तोडफोड; बंगळुरूच्या 5 जणांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT