Jackie Shroff with sunny deol, sanjay dutt in upcoming film Dainik Gomantak
मनोरंजन

जॅकी श्रॉफ, संजय दत्त, मिथुन दा आणि सनी देओल दिसणार एका चित्रपटात

90 च्या दशकात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना थिएटर्समध्ये यायला भाग पाडणारे कसलेले अभिनेते आता एकाच चित्रपटात दिसणार आहेत.

Rahul sadolikar

Jackie Shroff with sunny deol, sanjay dutt in upcoming film : अभिनेता जॅकी श्रॉफ, सनी देओल, संजय दत्त आणि मिथुन चक्रवर्ती यांनी 90 च्या दशकात आपल्या अभिनयाची चांगलीच मोहिनी घातली होती. त्या काळातल्या चित्रपटांसोबतचे मैत्रीच्या दुनियेतही या अभिनेत्यांनी मोहिनी निर्माण केली होती. आता हे सगळे मित्र आपल्या एकाच चित्रपटात दिसणार आहेत

नव्या चित्रपटाबाबत बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाले

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ जग्गू दादा या नावाने प्रसिद्ध आहे. हीरो, तेरी मेहेरबानिया, कर्मा आणि राम लखन यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने या अभिनेत्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. जॅकी श्रॉफ आपल्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असतो. 

त्याच वेळी, अभिनेता त्याच्या आगामी 'बाप' चित्रपटासाठी देखील चर्चेत आहे. या चित्रपटात जॅकी श्रॉफसोबत संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती आणि सनी देओल दिसणार आहेत. दरम्यान, जॅकी श्रॉफने एका मुलाखतीत आपल्या जुन्या मित्रांसोबत चित्रपटात काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.p

जॅकी श्रॉफ

जॅकी श्रॉफने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, बर्‍याच वर्षांनंतर मी माझे जुने मित्र संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती आणि सनी देओल यांच्यासोबत अॅक्शन थ्रिलर चित्रपटात काम करणार आहे. अभिनेता म्हणाला, 'मी जवळपास 30 वर्षांनंतर माझ्या सर्व मित्रांसोबत काम करण्यास उत्सुक आहे. 

या चित्रपटात एकत्र काम करणे म्हणजे कॉलेज रियुनियनसारखे आहे. जॅकी श्रॉफ म्हणाले, 'मी संजय दत्तसोबत खलनायक, सनी देओलसोबत त्रिदेव आणि मिथुन दासोबत अनेक चित्रपट केले. 

त्यामुळे कॉलेज रियुनियनसारखे वाटते. 'बाप' हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळ राहील, कारण या चित्रपटात मी माझे सर्व मित्र भेटले आहेत. त्यात इमोशन, अॅक्शन्स आणि भरपूर मजा असेल.

रोहित शेट्टीचं कौतुक करताना म्हणतात

या नव्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याबाबतही जॅकी श्रॉफ बोलले आहेत. अभिनेता म्हणाला, 'सिंघम अगेन'मध्ये आमचा कोणताही सीन आहे की नाही हे मला माहीत नाही, पण माझ्या मुलासोबत एकाच फ्रेममध्ये काम करणे नेहमीच आनंददायी असते. चित्रपटात हे दृश्य घडले तर ते ऐतिहासिक ठरेल.

रोहित शेट्टीचे कौतुक करताना तो म्हणाला की तो नेहमीच अप्रतिम चित्रपट करतो आणि टायगरसोबत त्याची जोडी खूप चांगली आहे. अभिनेता म्हणाला की तो एका चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहत आहे ज्यामध्ये ते दोघेही 'बाप आणि मुला'च्या भूमिकेत असतील.

मुलाबद्दल जॅकी दादा म्हणतात

जॅकी श्रॉफने त्याचा मुलगा टायगर श्रॉफबद्दल सांगितले , 'मला वाटते की माझा मुलगा माझा वारसा पुढे नेत आहे. त्याने असेच पुढे जात राहावे. त्याला जे काही करायचे आहे. त्यात मला कोणताही अडथळा निर्माण करायचा नाही. 

टायगरने सर्वांचा आदर करणे, कामाचा आदर करणे आणि कोणाबद्दलही नकारात्मक न बोलणे शिकले आहे. मी त्याला एवढेच सांगितले आहे की त्याने त्याचे काम करावे आणि चांगले आरोग्य वाढवावे.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT