Rahul Vaidya - Disha Parmar Dainik Gomantak
मनोरंजन

'इंडियन आयडल' फेम राहुल वैद्य बनला बाबा...गणेशोत्सवाच्या काळातच चाहत्यांसाठी गोड बातमी...

इंडियन आयडल फेम राहुल वैद्य आणि दिशा परमार आई - बाबा झाले आहेत. राहुल वैद्यने सोशल मिडीयावर पोस्ट करत ही गुड न्यूज दिली आहे.

Rahul sadolikar

इंडियन आयडल मधुन आपल्या आवाजाने वेड लावणाऱ्या राहुल वैद्य आणि बिग बॉस फेम दिशा परमार आई - बाबा झाले आहेत. सध्या गणेशोत्सवाचे आनंदी वातावरण असताना वैद्य कुटूंबाचा आनंद या बातमीने द्विगुणित झाला आहे.

दिशा परमार आणि राहुल वैद्य

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध मालिका 'बडे अच्छे लगते हैं'ची अभिनेत्री दिशा परमार आणि गायक राहुल वैद्य यांचे घर आनंदाने फुलले आहे. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दिशा आई झाली. 

तिने एका मुलीला जन्म दिला आहे. या दोघांनी सोशल मीडियावर चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे. साहजिकच चाहत्यांना या बातमीने खूप आनंद झाला आहे. चाहत्यांनी राहुल वैद्यच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

राहुल वैद्यची पोस्ट

बाळाचं आगमन होताच राहुल वैद्य आणि दिशा परमार यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे, ज्यात लिहिले आहे की, 'आम्हाला मुलगी झाली आहे. आई आणि मुलगी दोघीही निरोगी आहेत आणि पूर्णपणे बऱ्या आहेत. आम्ही आनंदी आहोत. कृपया मुलाला आशीर्वाद द्या.

इंडियन आयडल ते बिग बॉस

राहुल वैद्य 'इंडियन आयडॉल' या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता, जिथे त्याच्या आवाजाचे खूप कौतुक झाले होते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

राहुलने सलमान खानच्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस 14' मध्ये भाग घेतला, त्यानंतर तो पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला. याच शोमध्ये त्याला त्याची जोडीदार मिळाली .

लग्नापूर्वीचं रिलेशनशीप

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर राहुल आणि मॉडेल-अभिनेत्री दिशा परमार लग्नापूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. 

राहुल जेव्हा 'बिग बॉस 14' मध्ये होता तेव्हा त्याने दिशाला प्रपोज केले होते. दोघांनी 16 जुलै 2021 रोजी लग्न केले आणि 18 मे 2023 रोजी त्यांच्या गर्भधारणेची घोषणा केली.

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT