Nana Patekar  dainik gomantak
मनोरंजन

Nana Patekar Viral Video : नाना पाटेकर यांनी त्या फॅनला मारलं कारण...व्हायरल व्हिडीओचं सत्य

अभिनेते नाना पाटेकर यांनी व्हायरल व्हिडीओवर खुलासा करत माफी मागितली आहे.

Rahul sadolikar

Nana Patekar on his viral video : अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या रागीट स्वभावासाठी आणि थेट मतांसाठी ओळखले जातात. सध्या सोशल मिडीयावर नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये नाना त्यांच्यासोबत फोटो घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका फॅनला मारताना दिसत आहेत. या व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मिडीयावर फॅन्सकडून जोरदार टीका होत आहे.

व्हिडीओ व्हायरल

नाना पाटेकर हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. नानांनी आजवर अनेक सिनेमांंमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडली. नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ काल सोशल मीडियावर व्हायरल झाला.

नानांनी मागितली माफी

या व्हिडीओत सेल्फी घ्यायला आलेल्या एका फॅनला नाना पाटेकर यांनी मारल्याचं दिसलं. नाना पाटेकर यांनी या प्रकरणाबद्दल जाहीर माफी मागत, नेमकं काय घडलं याचा खुलासा केलाय.

व्हिडीओबद्दल नाना म्हणतात

नाना पाटेकर म्हणतात, 'एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये मी एका मुलाला मारल्याचं दिसतंय. हा सीन करणं आमच्या चित्रपटाचा भाग आहे, आमची रिहर्सल सुरु होती. त्यावेळी दिग्दर्शकाने या सीनची फायनल रिहर्सल करायाला सांगितली. व्हिडिओमध्ये दिसणारा मुलगा आला तेव्हा आम्ही रिहर्सलला सुरुवात करणार होतो.

Betul: उघड्यावर मद्यपान करणाऱ्यांचे गुंडाराज! जाब विचारणाऱ्या पोलिसांवर दगडफेक, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; झारखंडच्या 6 जणांना अटक

Bits Pilani: 'कुशाग्र'च्या मृत्यूमागे एनर्जी ड्रिंक अतिसेवनाचा संशय! व्हिसेरा राखून ठेवला; फुफ्फुस, मेंदूला इजा

Rashi Bhavishya 18 August 2025: व्यवसायात प्रगती,कुटुंबातील मतभेद मिटतील; आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक बदल होईल

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

SCROLL FOR NEXT