IIFA 2026 Winners List Dainik Gomantak
मनोरंजन

IIFA 2026 Winners List: IIFA पुरस्कार सोहळ्यात 'धुरंधर'चा जलवा! रणवीर सिंह सर्वोत्कृष्ट अभिनेता तर अनीत पड्डा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, पाहा संपूर्ण लिस्ट

Ranveer Singh Best Actor IIFA 2026: इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (IIFA) पुरस्कार २०२६ च्या २६ व्या आवृत्तीतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे.

Sameer Amunekar

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी (IIFA) पुरस्कार २०२६ च्या २६ व्या आवृत्तीतील विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेता रणवीर सिंहची मुख्य भूमिका असलेल्या आणि आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बाजी मारली. सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता यांसह अनेक महत्त्वाचे पुरस्कार या चित्रपटाने पटकावले. त्यामुळे यंदाच्या IIFA पुरस्कारांमध्ये ‘धुरंधर’चा मोठा दबदबा पाहायला मिळाला.

पुरस्कार सोहळ्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. ‘धुरंधर’सोबतच ‘सैयारा’ आणि ‘छावा’ या चित्रपटांनीही विविध श्रेणींमध्ये पुरस्कार मिळवले. विशेष म्हणजे, डिजिटल श्रेणीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजने लक्ष वेधून घेतले.

रणवीर सिंह आणि अनीत पड्डा ठरले सर्वोत्कृष्ट कलाकार

IIFA २०२६ मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिका) हा पुरस्कार रणवीर सिंहला ‘धुरंधर’साठी मिळाला. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ‘सैयारा’ चित्रपटातील अभिनयासाठी अनीत पड्डा हिला प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक या दोन्ही महत्त्वाच्या श्रेणींमध्येही ‘धुरंधर’ने बाजी मारली. आदित्य धर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

सहाय्यक भूमिकांमध्ये ‘जॉली एलएलबी ३’साठी हुमा कुरेशी हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, तर ‘धुरंधर’साठी संजय दत्त याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही अक्षय खन्ना याने ‘धुरंधर’साठी पटकावला.

‘सैयारा’ आणि ‘छावा’लाही पुरस्कार

‘सैयारा’ चित्रपटानेही यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात चांगली कामगिरी केली. या चित्रपटासाठी इरशाद कामिल यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा, तर फहीम अब्दुल्ला यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार मिळाला. श्रेया घोषाल हिला ‘सैयारा’मधील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार जाहीर झाला.

दुसरीकडे, ‘छावा’ चित्रपटाने तांत्रिक श्रेणींमध्ये आपली छाप पाडली. या चित्रपटासाठी आलोक डे यांना सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंगचा, तर ए. आर. रहमान यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीताचा पुरस्कार मिळाला. तसेच व्हिज्युअल इफेक्ट्स श्रेणीतही ‘छावा’ने पुरस्कार पटकावला.

डिजिटल श्रेणीत आर्यन खानच्या सीरिजचा दबदबा

चित्रपटांबरोबरच डिजिटल मनोरंजन क्षेत्रातील विजेत्यांचीही घोषणा करण्यात आली. ‘द बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या सीरिजने सर्वोत्कृष्ट सीरिजचा पुरस्कार मिळवला. आर्यन खान याला याच सीरिजसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय अन्या सिंह आणि राघव जुयाल यांनी सहाय्यक भूमिकांमधील पुरस्कार पटकावले.

‘पाताल लोक २’ या सीरिजनेही महत्त्वाचे पुरस्कार मिळवले. जयदीप अहलावत आणि तिलोत्तमा शोम यांना अनुक्रमे मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तसेच सर्वोत्कृष्ट मूळ कथेसाठीही ‘पाताल लोक २’ची निवड करण्यात आली.

IIFA 2026 पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

लोकप्रिय श्रेणी

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट – धुरंधर

  • सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट – अवतार: फायर अँड ॲश

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – आदित्य धर (धुरंधर)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेता – रणवीर सिंह (धुरंधर)

  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अनीत पड्डा (सैयारा)

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – हुमा कुरेशी (जॉली एलएलबी ३)

  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – संजय दत्त (धुरंधर)

  • नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता – अक्षय खन्ना (धुरंधर)

  • सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन – शाश्वत सचदेव (धुरंधर)

  • सर्वोत्कृष्ट मूळ कथा – आदित्य धर (धुरंधर)

  • सर्वोत्कृष्ट रूपांतरित कथा – बशारत पीर, सुमित रॉय आणि नीरज घेवान (होमबाउंड)

  • सर्वोत्कृष्ट गीत – इरशाद कामिल (सैयारा)

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – फहीम अब्दुल्ला (सैयारा)

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – श्रेया घोषाल (सैयारा)

तांत्रिक श्रेणी

  • सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी – विकास नौलखा (धुरंधर)

  • सर्वोत्कृष्ट पटकथा – आदित्य धर (धुरंधर)

  • सर्वोत्कृष्ट संवाद – आदित्य धर (धुरंधर)

  • सर्वोत्कृष्ट संपादन – शिवकुमार व्ही. पणिक्कर (धुरंधर)

  • सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी – बॉस्को लेस्ली मार्टिस (आवां जावन, वॉर २)

  • सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन – बिश्वदीप चॅटर्जी (धुरंधर)

  • सर्वोत्कृष्ट साउंड मिक्सिंग – आलोक डे (छावा)

  • सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत – ए. आर. रहमान (छावा)

  • सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स – असेंबलेज एंटरटेनमेंट, रीडिफाइन (छावा)

डेब्यू श्रेणी

  • सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण – राशा थडानी (आझाद)

  • सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण – अहान पांडे (सैयारा)

डिजिटल चित्रपट श्रेणी

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट – बाराओरिजिनला

  • सर्वोत्कृष्ट मूळ कथा – बाराओरिजिनला

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – करण तेजपाल (स्टोलन)

  • मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता – अभिषेक बॅनर्जी (स्टोलन)

  • मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – सान्या मल्होत्रा (मिसेस)

  • सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मोनिका पंवार (निशांची २)

  • सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता – अविनाश तिवारी (द मेहता बॉईज)

डिजिटल सीरिज श्रेणी

  • सर्वोत्कृष्ट सीरिज – द बॅड्स ऑफ बॉलिवूड

  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – आर्यन खान (द बॅड्स ऑफ बॉलिवूड)

  • सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – अन्या सिंह (द बॅड्स ऑफ बॉलिवूड)

  • सहाय्यक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता – राघव जुयाल (द बॅड्स ऑफ बॉलिवूड)

  • मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता – जयदीप अहलावत (पाताल लोक २)

  • मुख्य भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – तिलोत्तमा शोम (पाताल लोक २)

  • सर्वोत्कृष्ट मूळ कथा – पाताल लोक २

  • सर्वोत्कृष्ट डॉक्युसिरीज/डॉक्युफिल्म – द रोशन

  • सर्वोत्कृष्ट रिअॅलिटी/नॉन-स्क्रिप्टेड शो – द ट्रेटर्स

  • सर्वोत्कृष्ट टायटल ट्रॅक – उज्ज्वल गुप्ता (द बॅड्स ऑफ बॉलिवूड)

Mental Freedom from Toxic Relationships: नातं जपताना स्वतःला हरवू नका! मानसिक तुरुंगातून मुक्त होण्यासाठी शिका भावनिक अलिप्तता

''आता मग देशात एक आठवड्याची सुट्टी जाहीर करा!'', भारताविरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानी PM ट्रोल; नेटकऱ्यांनी घेतलं चांगलंच फैलावर

Goa Politics: सुदिन ढवळीकरांची निष्ठावंतांना संधी देण्याची मागणी; भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांच्या जखमेवर फुंकर?

Betoda Pollution Complaint: बेतोड्यातील दुर्गंधीवर मानवाधिकार आयोगाची नजर; युनायटेड स्पिरिट्सवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश

Goa Land Prices: पणजी, म्हापसा, कळंगुटमधील जमीन महागली; सरकारकडून 2026-27 चे किमान दर अधिसूचित

SCROLL FOR NEXT