IFFI 52nd: 'Satyajit Ray Lifetime Achievement Award' announced Martin and Istvan Dainik Gomantak
मनोरंजन

IFFI 52nd: मार्टिन आणि इस्तवान यांना 'सत्यजित रे जीवनगौरव' पुरस्कार जाहीर

सत्यजित रे यांचा स्मरणार्थ 'आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 2021 पासून केंद्र सरकारने' सत्यजित रे लाईफटाइम अचीव्हमेन्ट अवॉर्ड फॉर एक्सलन्स इन सिनेमा' ची स्थापना केली आहे.

दैनिक गोमन्तक

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival) या वर्षी गोव्यात (Goa) आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी 52 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परदेशातील दोन चित्रपट निर्मात्यांना 'सत्यजित रे जीवन जीवनगौरव पुरस्कार' जाहीर केला आहे. यात अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक मार्टिन स्कॉर्सेज (Martin Scorses) यांनी 'द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट' आणि 'टॅक्सी ड्रायव्हर' सारख्या अनेक हीट हॉलीवुड चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. तर हंगरी चित्रपटाचे निर्माते इस्तवान झांबो (Istvan Szabo) यांचे नाव यात आहे. यांनी 60 च्या दशकापासून 'सनशाइन'सारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.

दिग्गज चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त वर्षभर भारत आणि परदेशात उत्सव आयोजित केले जातील. एवढेच नाही, मंत्रालयाने हे देखील जाहीर केले आहे की 'सत्यजित रे' यांच्या स्मरणार्थ 2001 पासून भारतीय चित्रपट महोत्सवात 'सत्यजित रे लाइफटाइम अचिव्हमेंट फॉर एक्सलन्स इन सिनेमा 'ची स्थापना करण्यात आली आहे.

मार्टिन स्कॉर्सेज 'सत्यजित रे' यांच्याशी प्रभावित झाले आहेत

मार्टिन यांचे हॉलीवुडमध्ये महत्वपूर्ण योगदान दिले आहे. ते स्वता:ला खूप भाग्यवान समजत आहे. कारण त्यांच्यावर सत्यजित रे यांचा खूप प्रभाव होता. मार्टिन एकदा सत्यजित रेसाठी म्हणाले होते की, सिनेमाच्या तुलनेत लहान इतिहासात, सत्यजित रे हे त्या नावांपैकी एक आहे, यांच्याबद्दल सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे. यांचे चित्रपट आपण सर्वांनी बघणे आवश्यक आहे.

हंगरी चित्रपट उद्योगातील एक मोठे नाव आहे. इस्तवान झाबो दिग्दर्शकासह पटकथा लेखक आहे आणि ओपेरा दिग्दर्शक आहे. झाबो हे सर्वात प्रसिद्ध हंगरीयन चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे, जे 1960 च्या दशकाच्या उत्तरार्धात हंगेरीयन भाषिक जगाच्या बाहेर प्रसिद्ध आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

Bambolim Cancer Centre: ''बांबोळीचे कॅन्सर सेंटर निवडणुकीच्या आधी तयार होणार'' आरोग्यमंत्र्यांचा दावा!

Shreyas Iyer Captain: आशिया कपपूर्वी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद, भारताचा संघ जाहीर

SCROLL FOR NEXT