Rites Dainik Gomantak
मनोरंजन

माझ्या तिन्हीं मुलांना मी चांगले संस्कार दिले ; शत्रुघ्न सिन्हा

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणी शत्रुघ्न सिन्हा यांचा मोठा खुलासा

दैनिक गोमन्तक

सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबीने क्रूज ड्रग्ज पार्टी प्रकरणी 3 ऑक्टोबर रोजी अटक केली होती. काल 30 ऑक्टोबरला जवळपास महिनाभरानंतर आर्यन घरी परतला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यनच्या अटकेनंतर काही बॉलिवूड सेलिब्रिटींनी शाहरुखच्या समर्थनात उतरताना आपण पाहिले, तर काहींनी शाहरुखला तिखट प्रतिक्रिया देखील दिल्या. मात्र यावर आता शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया आली आहे. माझी तिन मुले 'सोनाक्षी, लव आणि कुश हे ड्रग्ज घेत नाहीत याचा मला आनंद आहे'.

माध्यमांनाशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, सेलिब्रिटींसाठी त्यांच्या मुलांना योग्य दिशा दाखवणे आव्हानात्मक असते. आव्हान असो वा नसो, चांगले संस्कार अंगी असायला हवे. मी स्वत: वरती विश्वास ठेवतो, मी स्वत:ला उपदेश करतो आणि त्या गोष्टी आचरणात आणतो. मी तंबाखू विरोधात अभियान करतो, ड्रग्जला माझा नेहमी विरोध राहील.

आज मी 'या' बाबतीत स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या तिन्हीं मुलांना चांगले संस्कार आहेत यांच्या बद्दल मी अभिमानाने सांगू शकतो की त्यांचे पालनपोषण चांगले झाले आहे. त्यांना अश्या कोणत्याही वाईट सवई नाहीत. पालकांनी आपली मुले एकटी राहणार नाहीत, किंवा चुकीच्या संगतीत पडणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे. त्यांनी मुलांना वेळ देणे गरजेचे आहे, असेही शत्रुघ्न सिन्हा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Richard Mille luxury watch: अंबानींची 'रॉयल' भेट! लिओनेल मेस्सीला दिलं 11 कोटींचं घड्याळ, 'रिचर्ड मिल' ब्रँडचं वैशिष्ट्यं काय?

सायबर गुन्ह्यांविरुद्ध 'मूग गिळून गप्प' बसू नका: तक्रार करा, साखळी तोडा!

थायलंड समजून गोव्यात येऊ नका! नाईटक्लब बंद करण्याची भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांची मागणी

कायद्याचा बडगा की केवळ दिखावा? लुथरांच्या सुटकेसाठी 'पहिली चाल' खेळली गेली का? - संपादकीय

SMAT Final 2025: हरियाणा की झारखंड? कोण उंचावणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी? फायनल सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT