Hritik Roshan Viral Photo Dainik Gomantak
मनोरंजन

Hritik Roshan : क्या बात है ! हृतीक रोशनचा हा व्हायरल फोटो पाहिलात का? याला म्हणतात फिटनेस

Rahul sadolikar

अभिनेता हृतिक रोशन त्याच्या डान्स आणि फिटनेससाठी इंडस्ट्रीत एक आगळा वेगळा अभिनेता म्हणुन ओळखला जातो. आपल्या अॅब्सनी तरुणाईला घायाळ करणाऱ्या हृतीकचा एक फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

हृतीकची कॅप्शन

अभिनेता हृतिक रोशन याने शनिवारी एक नवीन शर्टलेस फोटो टाकल्याने इंटरनेटवर खळबळ उडाली. इंस्टाग्रामवर, हृतिकने एक फोटो शेअर केला आणि त्याने कॅप्शन दिले, “फिनिश लाइन पाहू शकत नाही.”

या मोनोक्रोम फोटोमध्ये, तो त्याच्या सिक्स पॅक अॅब्सची चमक दाखवताना दिसतोय. हृतीकने पोस्ट शेअर केल्यानंतर लगेचच, त्याच्या मित्रांनी आणि चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट्सचा पाऊस पाडला.

चाहत्यांच्या कमेंटस

हृतिकची मैत्रीण सबाने या फोटोवर कमेंट मसल फायर आणि हार्ट इमोटिकॉन टाकला. एका युजरने लिहिले, "कारण तुमचा 'कीप गोइंग' मंत्रावर विश्वास आहे आणि म्हणूनच तुमचे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी तुमची मेहनत आणि जिद्द कधीही संपणार नाही." "ग्रीक देव," अशीही कमेंट एका चाहत्याने केली.

'फायटर'ची चर्चा

दरम्यान, वर्कफ्रंटवर, हृतिकने अलीकडेच त्याच्या आगामी 'फाइटर' चित्रपटाच्या एका वेधक मोशन पोस्टरचे अनावरण केले ज्यामध्ये दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांचा भारतीय वायुसेनेच्या पायलट म्हणून पहिला लूक दिसतोय.

रनवे शॉटने या क्लिपला सुरूवात होते आणि नंतर हृतिक फ्रेममध्ये येतो. हृतीकला हा पायलटच्या लूकमध्ये खूपच दिसत आहे. पुढे या क्लिपमध्ये दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर दिसतात. दिपीका आणि अनिल कपूरही पायलटच्या पोषाखात दिसतात. या क्लिपमध्ये हे तिघेही हेल्मेट आणि सनग्लासेस घातलेले दिसत आहेत.

हा लूक शेअर करताना, हृतिकने इंस्टाग्रामवर लिहिले, "#SpiritOfFighter | वंदे मातरम! भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चित्रपटगृहांमध्ये भेटू. 25 जानेवारी 2024 रोजी फायटर जगभरात प्रदर्शित होत आहे." दीपिका, हृतिक आणि अनिलच्या फर्स्ट लूकने सर्वांनाच उत्सुकता दाखवली आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फाइटर'मध्ये अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 25 जानेवारी 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT