Brahmastra-2 Dainik Gomantak
मनोरंजन

Brahmastra-2 वर हृतिक रोशन मौन सोडत म्हणाला...

'ब्रह्मास्त्र 1' मध्ये रणबीर कपूरने मुख्य भूमिका शिवाची आणि आलिया भट्टने ईशाची भूमिका साकारली होती.

दैनिक गोमन्तक

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र' ने बॉक्स अॉफिसवर धम्माल केली आहे. आता ब्रह्मास्त्र पार्ट 1: शिव रिलीज झाल्यापासून, 'ब्रह्मास्त्र पार्ट 2: देव' मध्ये कोणता अभिनेता कोणती भुमिका साकारणार आहे, याबद्दल चाहत्यांनी अंदाज लावला आहे. हृतिक रोशन अशा अभिनेत्यांपैकी एक आहे ज्याच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. आता यावर हृतिक रोशनची प्रतिक्रिया समोर आली आहे. हृतिकने सांगितले की, तो अयान मुखर्जीच्या फॅन्टसी ट्रायलॉजीच्या दुसऱ्या भागात दिसणार आहे.

'ब्रह्मास्त्र पार्ट 1' मध्ये रणबीर कपूरने मुख्य भूमिकेत शिवाची भूमिका केली तर आलिया भट्टने ईशाची भूमिका साकारली होती. अयानने ब्रह्मास्त्र पार्ट 2 बद्दल सांगितले होते की तो भूतकाळ आणि वर्तमानात बदल करेल आणि त्याचे लक्ष प्रतिपक्षावर केंद्रित करेल. हृतिकने आपण देवची भूमिका साकारत असल्याची पुष्टी केली नसली तरी, तो म्हणाला की तो कोणत्या ना कोणत्या प्रकारे या प्रकल्पाशी संबंधित असू शकतो.

हृतिक म्हणाला - फिंगर क्रॉस

अलीकडेच पीटीआयशी बोलतांन, हृतिक रोशनला ब्रह्मास्त्र तसेच नितेश तिवारीच्या 'रामायण' चित्रपटात कास्ट केल्याबद्दल देखील प्रश्न विचारण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना हृतिक म्हणाला, "काय चाललंय? काहीच होत नाहीये. पुढचा प्रोजेक्ट फायटर असेल आणि मग या सगळ्या प्रोजेक्टशी संबंधित एक शक्यता आहे, ज्याला तुम्ही फिंगर क्रॉस नाव दिलंय."

फायटरमध्ये हृतिक रोशन पहिल्यांदाच दीपिका पदुकोणसोबत काम करताना दिसणार आहे. याशिवाय अनिल कपूरही यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ आनंद या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. हृतिक सध्या त्याचा पुढचा आगामी चित्रपट विक्रम वेधाच्या रिलीजसाठी तयारी करत आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी पडद्यावर येणार आहे. पुष्कर आणि गायत्री यांनी दिग्दर्शित केलेला, अॅक्शन क्राईम थ्रिलर विक्रम आणि बेताल या भारतीय लोककथेवर आधारित आहे.

2025 मध्ये रिलीज होणार 'ब्रह्मास्त्र-2'

दरम्यान, अयान मुखर्जीने सांगितले आहे की तो 2025 मध्ये ब्रह्मास्त्र भाग 2 रिलीज करण्याचा विचार करत आहे. रणबीर आणि आलिया व्यतिरिक्त, पहिल्या भागात अमिताभ बच्चन, नागार्जुन यांच्या व्यतिरिक्त मौनी रॉय, शाहरुख खानचा विस्तारित कॅमिओ आणि दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) विशेष भूमिका साकारल्या होत्या.हा 9 सप्टेंबर रोजी सिनेमागृहात रिलीज झाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

Origin of Goans: 6000 ईसापूर्व भारतीय पुरुषांचे इराणमध्ये स्थलांतर झाले; गोमंतकीयांच्या मूलस्थानाचा शोध

फोन देण्यासाठी दार उघडले, समोर दिसला मृतदेह; सॉफ्टवेअर अभियंत्याचा हणजूण हॉटेलमध्ये रहस्यमय मृत्यू

SCROLL FOR NEXT