Hina Khan Dainik Gomantak
मनोरंजन

Hina Khan : "हे लोक धर्माची चेष्टा करतात, आधी उमराह आणि आता बाप्पा" 'हीना खान'ला यूजर्स करतायत ट्रोल

अभिनेत्री हीना खानला गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर विकृत ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे.

Rahul sadolikar

Hina Khan trolled after visiting Andhericha Raja for Ganesh Chaturthi : कट्टर मानसिकतेचा सामना कुणाला कधी करावा लागेल, कोण कधी कुठल्या कारणाने ट्रोल होईल हे सांगणं खूप कठीण आहे.

सोशल मिडीयावर उच्चशिक्षित समजले जाणारे तरुणही धार्मिक द्वेषाचा पुरस्कार करतात. कित्येकदा सेलिब्रिटींनाही हा वाईट अनुभव येतो.

एखाद्या धर्मावरुन त्याला ट्रोल करणं किंवा अपशब्द बोलणं ही विकृती आहे याचं भानही या ट्रोलर्सना नसतं.

हिना खानला केलं जातंय ट्रोल

अभिनेत्री हिना खानला (Hina Khan ) विकृत ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. हिना खानचा व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. गणेश चतुर्थीनिमित्त ती गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेल्या हिनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

गणपती बाप्पाला वंदन करण्यासाठी आलेल्या हिनावर काही युजर्सनी तिच्या धर्मावरुन विचित्र कमेंट केल्या आहेत. नुकतीच हिना 'अंधेरी चा राजा'च्या दर्शनासाठी आली होती. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताच काही यूजर्सनी तिच्यावर निशाणा साधला आहे.

अंधेरीच्या राजाचे दर्शन

मुंबईत सध्या गणेश उत्सवाचा (Ganesh Festivel In Mumbai ) उत्साह पाहायला मिळत आहे. या सेलिब्रेशनला हिना खाननेही हजेरी लावली होती. तिने अंधेरीच्या राजाचे दर्शन घेतले. इतर भाविकांप्रमाणे हिनानेही दर्शनाला हजेरी लावली होती.

हिनाने नतमस्तक होऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होताच काही यूजर्सनी तिला धर्मावरुन ट्रोल करण्यास सुरूवात केली.

धर्मावरुन ट्रोलिंग

गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर हिना खान कट्टरवाद्यांच्या निशाण्यावर आली आहे. युजर्स धर्माचा हवाला देत त्याच्या व्हिडिओंवर कमेंट करत आहेत. 

एका यूजरने लिहिले की, 'हे लोक फक्त धर्माची चेष्टा करतात. काही दिवसांपूर्वी ती उमराहसाठी गेली होती आणि आता...'. दुसऱ्याने लिहिले की, 'या लोकांना आदर नाही.' एका यूजरने अशीही कमेंट केली, 'या लोकांचा कोणताही धर्म नाही...'

हिना सध्या खतरो खिलाडी मध्ये

हिना खान सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. ती 2022 मध्ये 'षडयंत्र' या मालिकेत दिसली होती. याशिवाय ती रोहित शेट्टीच्या स्टंटवर आधारित शो 'खतरों के खिलाडी सीझन 13' मध्ये चॅलेंजर म्हणून दिसणार आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने शूटिंग पूर्ण केले होते.

हिनाची पर्सनल लाईफ

पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर हिना 2014 पासून 'ये रिश्ता क्या कहलाता है' या सीरियलचा सुपरवायझर प्रोड्यूसर रॉकी जैस्वालला डेट करत आहे. 'बिग बॉस सीझन 11' मध्ये हिनाने रॉकीसोबतच्या आपल्या नात्याबद्दल सांगितले होते.

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

Goa Beef Shortage: गोव्यातील गोमांस पुरवठा साखळीला ब्रेक, गोरक्षकांच्या कथित हल्ल्यांविरोधात महाराष्ट्र कर्नाटकात संप!

GST 2.0: जीएसटीच्या नव्या दरांची लवकरच घोषणा! सिगारेटवर द्यावा लागणार 40 टक्के कर; केंद्र सरकारचा नवा प्रस्ताव

Viral Video: पाकिस्तानी तरुणीची देशभक्ती पाहून लोक थक्क, स्वातंत्र्य दिनी गायलं 'भारतीय गाणं'; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

Honour Killing: डॉक्टर बहिणीची लहान भावानेच केली गोळ्या झाडून हत्या; थरकाप उडवणाऱ्या घटनेबाबत धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT