Heropanti 2 Twitter/Tiger Shroff
मनोरंजन

Heropanti 2 लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; उद्या होणार ट्रेलर रिलीज

निर्मात्यांनी 'हीरोपंती 2'चा ट्रेलर रिलीज करण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

Tiger Shroff : बॉलीवूडमधील सर्वात 'फिटेस्ट' अभिनेत्यांपैकी एक म्हणजे टायगर श्रॉफ. त्याने हीरोपंती या चित्रपटामधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. सुरुवातील त्याला अनेक टीकांचा सामना करावा लागला होता. पण नंतर तो चाहत्यांच्या गळ्यातील ताईत बनला. आता लवकरच टायगर श्रॉफ हीरोपंती चित्रपटाच्या सिक्वेलमधून पुन्हा एकदा आपली हीरोपंती दाखवणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे आणखी एक नवीन पोस्टर रिलीज करण्यात आले असून, यासोबतच निर्मात्यांनी 'हीरोपंती 2'चा ट्रेलर रिलीज करण्याची घोषणा केली आहे. (Heropanti 2 soon to hit theaters Trailer release tomorrow)

लवकरच आता हीरोपंती 2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पोस्टरमध्ये, तो कारच्या बोनेटवर पाय ठेवून बसला आहे आणि त्याच्या हातात बंदूक आहे. पोस्टरमध्ये टायगर श्रॉफचा रफ अँड टफ लूक दाखवण्यात आला आहे. पोस्टर रिलीज होताच त्याच्या पात्राचे नावही जाहीर करण्यात आले आहे. या नवीन पोस्टरच्या रिलीजसोबत टायगर श्रॉफने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'Action, Swag आणि Heropanti, सगळ्यांना येत नाही आणि माझी जात नाही'.

‘हीरोपंती 2’चे नवीन पोस्टर रिलीज करण्यासोबतच टायगर श्रॉफने हे देखील सांगितले की, त्याच्या चित्रपटाचा ट्रेलर उद्या 12 वाजता रिलीज होणार आहे. टायगर श्रॉफच्या ट्रेलर रिलीजची घोषणा आणि या पोस्टरमुळे चाहत्यांची उत्सुकताही वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT