Amruta Fadnavis Dainik Gomantak
मनोरंजन

'मनीके मागे हीते' या गाण्याचं अमृता फडणवीस यांच्या आवाजातील व्हर्जन ऐकले का?

गाण्याचा व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन शेअर केल आहे.

दैनिक गोमन्तक

मागील काही दिवसांपासून 'मनिके माके हिते' या रॅप सॉंगची जोरदार चर्चा रंगली आहे. या सॉंगचे अनेक भाषांमध्ये नव नवीन व्हर्जन्स येत आहेत. यातच आता महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा या रॅप सॉंगमुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.

दरम्यान, या रॅप सॉंगच्या एका पॅचमध्ये अमृता यांनी रॅप साँगच्या तालावर गायन केले आहे. माजी मुख्यमंत्री (Former Chief Minister) आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते (leader of the opposition) देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांची पत्नी तसेच गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या सोशल नेटवर्किंगवर कायम सक्रीय असतात. कधी अप्रत्यक्षपणे राजकीय परिस्थितींवर केलेलं त्यांचे भाष्य तर कधी त्यांच्या गाण्यांमुळे सोशल मीडियावर झालेली त्यांची चर्चा का.

Amruta Fadnavis
Amruta Fadnavis

मच आपल्याला दिसुन येतात. कालपासून अमृता पुन्हा चर्चेत आल्या आहेत, त्याच कारणही त्याचं नवं गाणं आहे. ‘मानिके मागे हिते’या (MANIKE MAGE HITHE) श्रीलंकन गाण्याचं (Sri Lankan song) हिंदी वर्जन अमृता यांनी गायलं आहे. कालच या गाण्याचा व्हिडीओ अमृता यांनी आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन शेअर केल आहे.

श्रीलंकन ​​गायक योहानी डिलोका डी सिल्वाने (Yohani Diloka de Silva) गायलेलं हे गाणं जगभरामध्ये धुमाकूळ घालत असतानाच अमृता यांनी याच गाण्याच्या चालीवर त्याचं हिंदी व्हर्जन गायलं आहे. या गाण्यामध्ये अमृता यांनी एका पॅचमध्ये रॅप साँग पद्धतीचं गायनही केलं आहे.

Amruta Fadnavis
Amruta Fadnavis

“सध्याच्या तापलेल्या राजकीय वातावरणामद्ये थोडं चील-पील व्हा या कूल गाण्यासोबत,” अशा कॅप्शनसहीत अमृता यांनी हे गाणं शेअर केलं आहे. मात्र या गाण्यावरुन अमृता यांना ट्रोल केलं जात आहे. अमृता यांनी ट्विटरवरुन या गाण्याची लिंक शेअर करताना त्याच्यावर कोणाला कमेंट्स करता येणार नाही याची काळजी घेतली आहे. मुंबईतील नदी संवर्धनासाठी यापूर्वी अमृता यांनी गाणं गायलं आहे. त्याचबरोबरच अमृता यांनी 'तिला जगू द्या' हे स्त्री भ्रूणहत्या रोख्यासंदर्भातील जनजागृती करणारं गाणंही यापूर्वी गायलेलं आहे.

योहानीने श्रीलंकन गायक आणि संगीतकार सतीशनसोबत गायलेलं ‘मानिके मागे हिते’ गाणं युट्यूबवर 22 मे 2021 रोजी अपलोड करण्यात आलं होतं. या गाण्याला सर्वच देशांमधून उत्तम प्रतिसाद मिळाल्याने ते जगभरामध्ये चर्चेत आलं. टिक-टॉक आणि इन्स्टाग्रामवर अनेक सेलिब्रिटींनी या गाण्यावर रिल्स शूट केल्याने हे गाणं अगदी सर्वसामान्यांपर्यंत पोहचलं. या गाण्याला युट्यूबवर 75 मिलियनहून अधिक व्ह्यूज आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT