Harry Potter Tv series: हॅरी पॉटरची कथा केवळ लहान मुलांनाच नाही तर सर्व वयोगटातील लोकांनाही आवडते. हॅरी पॉटर चाहत्यांना मोठी भेट देताना निर्मात्यांनी घोषणा केली आहे की आता हॅरी पॉटरवर एक टीव्ही मालिका देखील लवकरच भेटायला येणार आहे.
ज्यामध्ये तुम्हाला हॅरी पॉटर पुन्हा एकदा आपल्या जादूच्या कांडीने प्रेक्षकांवर जादू करताना दिसणार आहे. ही मालिका एचबीओ मॅक्स निर्मित करत आहे. याचा एक टीझरही नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
हॅरी पॉटरचा टीझर रिलीज
HBO ने आपल्या ट्विटर हँडलवर त्याचा टीझर शेअर केला आहे. हे शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की - 'मॅक्सने पहिली #HarryPotter स्क्रिप्टेड टेलिव्हिजन मालिका ऑर्डर केली आहे...'
याशिवाय डिस्कव्हरी टीमने हे देखील उघड केले की ही एक दशकभर चालणारी मालिका असणार आहे. ही बातमी ऐकल्यानंतर हॅरी पॉटरचे चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिक वाढली आहे.
काही वर्षांपुर्वी भारतात झालेल्या एका सर्व्हेक्षणातून हॅरी पॉटर हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय हॉलीवूड कॅरेक्टर असल्याचे समोर आले होते. या सर्व्हेत दुसऱ्या क्रमांकावर होता पायरेट्स ऑफ द कॅरेबियनचा जॅक स्पॅरो आहे.
अभिनेता डॅनियल रॅडक्लिफनं (Daniel Radcliffe) हॅरी पॉटरमध्ये (Harry Potter) फिल्म सीरिज हॅरीची भूमिका साकारली. त्याचा चाहता वर्ग मोठा आहे. तो या टेलिव्हिजन सीरिज काम करणार आहे की नाही? याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
हॅरी पॉटर अँड फिलॉसॉफर्स स्टोन, हॅरी पॉटर अँड चेंबर ऑफ सिक्रेट्स, हॅरी पॉटर अँड प्रिसिअर ऑफ अझकाबन, हॅरी पॉटर अँड द गॉब्लेट ऑफ फायर, हॅरी पॉटर अँड द ऑर्डर ऑफ द फिनिक्स, हॅरी पॉटर अँड हाफ-ब्लड प्रिन्स, हॅरी पॉटर अँड द डेथली हॅलोज: पार्ट 2 यांसारखे हॅरी पॉटरचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.
या टीझरच्या आधी वॉर्नर ब्रदर्स डिस्कवरीने घोषणा केली होती की ही मालिका जेके रोलिंग यांच्या हॅरी पॉटर या पुस्तकावर आधारित असेल. जे Max वर प्रवाहित होईल. याशिवाय, जेकेच्या प्रत्येक पुस्तकात इतक्या कथा आहेत की त्यांच्यावर मालिका बनवली तर एक दशक निघून जाईल, असेही ते म्हणाले होते.
ही मालिका कधी स्ट्रीम होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मॅक्स स्ट्रीमिंग सर्व्हिस प्लॅटफॉर्म एचबीओ मॅक्स आणि डिस्कव्री प्लसचे संयोजन करते आणि 23 मे रोजी अधिकृतपणे युनायटेड स्टेट्समध्ये लॉन्च केले जाईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.