Ram Kapoor  Instagram/@iamramkapoor
मनोरंजन

Happy Birthday: राम कपूरने कोणासाठी कमी केले वजन ?

राम कपूर आपल्या लठ्ठपणामुळे अनेक टीव्ही आणि चित्रपटांमध्ये त्यानुसारच अभिनय करत असे. पण जाणून घ्या त्याने अचानक फिट राहण्याचा का निर्णय घेतला.

दैनिक गोमन्तक

बॉलीवुड अभिनेते राम कपूर यांचे एकेकाळी खूप वजन वाढून गेले होते. तसेच त्यांना धूम्रपानाची सुद्धा वाईट सवय होती. पण नंतर त्यांच्या मुलीच्या सांगण्यावरून त्यांनी ही वाईट सवय सोडली.

Ram Kapoor

एक काळ असा होता की राम कपूर एका दिवसात 50 सिगारेट ओढत असे. पण नंतर मुलीच्या सांगण्यावरून ती वाईट सवय सोडली. राम म्हणाला वडील झाल्यानंतर तुम्ही स्वत:चे निर्णय घेत नाही तर मुले घेतात. माझ्या मुलीने मला जे सांगितले ते मी केले कारण एकेदिवशी धूम्रपान विरोधी जाहिरात पाहिली आणि रडत तिने मला म्हंटले की पप्पा तुम्ही धूम्रपान सोडून द्या. माझे माझ्या मुलीवर खूप प्रेम आहे.

त्यानंतर रामने त्याच्या फिटनेसकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. त्याचे वजन कमी झालेले पाहून त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला. अनेक लोकांना वजन कमी करण्याची प्रेरणा त्याच्यापासून मिळाली. 2013 मध्ये रामने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते, "मला वजन कमी करायचे नाही कारण माझा लठ्ठपणा हा ब्रॅंड बनला आहे."

Ram Kapoor

रामने आपल्या करीयरची सुरुवात 1998 मध्ये एका टीव्ही मालिकेपासून केली. पण त्यांना खरी लोकप्रियता 2000 मध्ये "घर एक मंदिर" या मालिकेतून मिळाली. या मालिकेत रामसोबत गौतमी होती. या मालिकेत गौतमी रामच्या वाहिनीची भूमिका निभावत होती. सोबत काम करताना ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

Ram Kapoor

राम ने "क्योंकि सास भी कभू बहू थी", "कसम से" आणि "बड़े अच्छे लगते हैं" यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले आहे. शिवाय "स्टुडंट ऑफ द इयर" (Student of the Year) , "एजंट विनोद", "हमशकल्स", "मेरे डॅड की मारुती" आणि "बार बार देखो" यासरख्या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले आहे.

Ram Kapoor

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Goa Live News: गणेश मूर्ती तयार करण्याचे का पुढील ४-५ दिवसांत काम पूर्ण होण्याच्या मार्गावर

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

Ponda: बनावट दाखला प्रकरण! नगरसेवकाला जामीन; काँग्रेसची सखोल चौकशीची मागणी

Goa: 'राज्यात घरे कायदेशीर करताना दंडही वसूल करणार', मुख्‍यमंत्र्यांनी दिली माहिती; सहकार्याचे कोमुनिदाद पदाधिकाऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT