Happy Birthday Arijit Singh
Happy Birthday Arijit Singh Dainik Gomantak
मनोरंजन

Happy Birthday Arijit Singh: 'किंग ऑफ प्लेबैक सिंगर'

दैनिक गोमन्तक

अरिजित सिंगने (Arijit Singh) प्रत्येक वेळी गाणे गाताना लोकांच्या भावनांना भिडणाऱ्या त्याच्या सौम्य गायनाने स्वतःला त्याच्या पिढीतील सर्वात लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणून स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. अरिजीत रोमँटिक आणि पॉवर-पॅक्ड अपबीट दोन्ही समान सहजतेने आणि उत्कटतेने सादर चाहत्यांसमोर करतो. अरिजितचा मधुर आवाज आपल्या कानात मधासारखा घोळत असतो असं म्हणायला हरकत नाही. मग ते दुःख असो, प्रेम असो किंवा आनंद असो, अरिजितची गाणी नेहमीच चांगल्या पद्धतीने भावना व्यक्त करतात आणि आपल्या भावनांशी एकजूट होऊन जातात. (Happy Birthday Arijit Singh King of Playback Singer)

मर्डर 2 मधून मिथूनच्या "फिर मोहब्बत" या गाण्याद्वारे अरिजित सिंगने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून हा त्याच्यासाठी फक्त चढाईचाच प्रवास राहिला आहे. अरिजितचा संगीताचा ब्रँड मौलिकतेबद्दल आहे आणि तो त्याच्या लाखो चाहत्यांना प्रेरणा देत असतो. त्याचे संगीत सीमा ओलांडते आणि लोकांना भावनांशी खेळवते. इंडस्ट्रीतील सर्वात मोठ्या अभिनेत्यांसाठी, त्यांच्यासाठी हिट दिलेली त्याची काही गाणी येथे आहेत.

छपाक शीर्षक ट्रॅक

हे गाणे आजही ऐकल्यानंतर आपल्याला गूजबंप्स येतात. अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेच्या भूमिकेत असलेल्या दीपिकाच्या वेदना आणि व्यथा तुम्हाला अरिजितच्या मजबूत आवाजाने मनाला स्पर्श करतात तर त्या गाण्याचे बोल हे गुलजार साहेबांचे आहेत.

चन्ना मेरया

ए दिल है मुश्कीलचा संपूर्ण अल्बम एकदम अप्रतिम आहे. रणबीर कपूरच्या हृदयविकाराच्या व्यक्तिरेखेला चाहत्यांसमोर व्यक्त करण्यासाठी चन्ना मेरेयापेक्षा चांगले गाणे असूच शकत नाही. दुसरीकडे, ADHD मध्ये अरिजितची इतरही अप्रतिम गाणी आहेत. आगर तुम साथ हो, चन्ना मेरेया सारख्या क्लासिक हार्टब्रेक गाण्यांसाठी प्रसिद्ध, द ब्रेकअप गाणे अरिजीत ADHD मध्ये ब्रेकअपला आनंदी ट्विस्ट देण्यात माहिर झाला आहे.

कलंक शीर्षक ट्रॅक

आणखी एक अतिशय चमकदार गाणे म्हणजे, हा ट्रॅक आणि त्यात वरुण धवनने देखील मोठे यश मिळवले. खरं तर, लॉकडाऊन दरम्यान, गाण्याचे 'मैं तेरा' एडिट पूर्णपणे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आशिकी 2

या चित्रपटाच्या गाण्यांच्या ट्रॅकशिवाय ही यादी पूर्ण होणार नाहीये. आदित्य रॉय कपूरचे त्या चित्रपटातील तेजस्वी पण, आणि दोष नसलेली व्यक्तिरेखा म्हणजेच राहुल प्रचंड यशस्वी ठरली आणि त्यामागील एक मोठे कारण म्हणजे राहुलच्या मागे अरिजितचा आवाज.

तेरा यार हूं मैं

मैत्रीचे गाणे असेल तर ते हे गाणे असणारचं. कार्तिक आर्यन आणि सनी सिंग यांच्यातील मैत्रीची संदर दृश्ये या गाण्यातून आपल्याला जाणवतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vegetable Prices Update: राज्यात फळभाज्यांचे दर भडकले, लसूण 320 रुपये किलो; सर्वसामान्यांना महागाईचे चटके

Holy Spirit Feast In Margao: होली स्पिरिट चर्चच्या फेस्ताची सुरवात; मडगाव पालिकेचे 35 लाख महसुलाचे लक्ष्य

Egg Prices Increased: गोव्यात मासळीपाठोपाठ आता बॉयलर अंड्यांचे भाव गगनाला भिडले; दरातील चढउतार सुरूच

Kushavati River: केपेतील ‘कुशावती’चे पाणी प्रदूषित; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात!

Goa Crime News: भागीदारीसाठी गुंतवलेल्या पैशांमध्ये केली अफरातफर; कळंगुट पोलिसांनी सहाजणांविरुद्ध नोंदवला गुन्हा

SCROLL FOR NEXT