Habits of actors in Bollywood that you may not know  Dainik Gomantak
मनोरंजन

बॉलिवूड स्टार्सच्या चित्र-विचित्र सवयी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

बॉलिवूडमधील (Bollywood) काही कलाकरांना साबणाचे कलेक्शन करण्याची आवड आहे, तर काहींना बाथरूममध्ये बसून पुस्तके वाचायला आवडतात.

दैनिक गोमन्तक

आज आम्ही बॉलिवूड (Bollywood) कलाकारांच्या अशा काही सवयींबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. होय, बॉलिवूडमधील काही कलाकरांना साबणाचे कलेक्शन करण्याची आवड आहे, तर काहींना बाथरूममध्ये बसून पुस्तके वाचायला आवडतात. बॉलिवूड कलाकारांच्या अद्भुत छंदांबद्दल जाणून घेऊया...

Bollywood actor Salaman Khan

सलमान खान: मीडिया रिपोर्टनुसार, सलमान खानला (Salman Khan) साबणाचे कलेक्शन करणे फार आवडते. असे म्हटले जाते की सल्लू मियांकडे काही निवडक आणि अद्वितीय साबणांचा संग्रह आहे. या साबणांमध्ये फळ आणि भाज्यांच्या अर्कांपासून बनवलेले साबण समाविष्ट आहेत.

Bollywood actor Ayushmann Khurrana

आयुष्मान खुराना: बॉलिवूडमधील प्रतिभावान स्टार्सपैकी एक, आयुष्मान खुराना (Ayushmann Khurrana) दात स्वच्छ करण्याबाबत खूप काळजी घेतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयुष्मान नेहमी त्याच्या मोत्याच्या दातांसाठी डेंटल किट ठेवतो.

Bollywood actor Amitabh Bachchan

अमिताभ बच्चन: अभिनेते अमिताभ (Amitabh Bachchan) यांच्याबद्दल असे म्हटले जाते की, जेव्हा त्यांची मुले परदेशात जातात तेव्हा बिग बी दोन घड्याळे घालतात. एक भारताचा वेळ दाखवतो आणि दुसरा देशाची वेळ दाखवतो जिथे त्यांची मुले गेली आहेत. एवढेच नाही तर असे म्हटले जाते की, नेटवर्कची समस्या टाळण्यासाठी अमिताभ बच्चन अनेक मोबाईल फोनही सोबत ठेवतात.

Bollywood actress Sushmita Sen

सुष्मिता सेन: सुश्मिता सेन (Sushmita Sen), जी मिस युनिव्हर्स होती, तिला सरपटणाऱ्या प्राण्यांवर खोल प्रेम आहे. बातमीनुसार, सुष्मिता सेनने तिच्या घरात अजगरही ठेवला आहे.

Bollywood actor Saif Ali Khan

सैफ अली खान: बातमीनुसार, सैफ अली खानला (Saif Ali Khan) पुस्तके वाचण्याची आवड आहे. असे म्हटले जाते की सैफ अली खानला त्याच्या बाथरूममध्ये टाइम घालवणे आवडते. सैफच्या बाथरूममध्ये एक लहान ग्रंथालय देखील आहे. अशा परिस्थितीत सैफ येथे तासन्तास पुस्तके वाचत बसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Monsoon Flowers: 'सोनेरी हरणा, गुलाबी तेरडे, शुभ्र तुतारी'! श्रावणातील फुलांचा अवर्णनीय सोहळा

Khazan Farming: गोव्यातील शेकडो वर्षांपूर्वीची परंपरा धोक्यात! खारफुटींचे अतिक्रमण वाढले; खाजन शेती मरणासन्न

Bicholim Murder: डिचोलीत 5 जणांचे खून! परप्रांतीयांचा संबंध चिंताजनक; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात

Sattari: सत्तरीत जनजीवन विस्कळीत; झाडांची मोठ्या प्रमाणावर पडझड, लाखोंची हानी

Goa Electricity Tariff: वीज खात्याचेच 74.82 कोटींचे बिल थकीत! अमित पाटकरांनी केली पोलखोल; तुटीमुळेच वीजदर वाढवल्याचा दावा

SCROLL FOR NEXT